तालुका प्रतिनीधी,नागभिड . नागभिड:तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या तळोधी(बा.) येथील भाजप सरपंच छायाताई मदनकर व ग्रांमपंचायत सद्स्य किशोर कटारे, यांनी तालुका काँग्रेस कार्यालय नागभीड येथे काँग्रेसमध्ये प्रवेश करून तळोधीच्या रजकारणात एक भुकंपाचा धक्काच दिला. चिमुर विधानसभा काँग्रेसचे समन्वयक तथा माजी जि.प.अध्यक्ष, तथा गटनेते डाँ.सतिशभाऊ वारजूकर यांनी काँग्रेस कमेटीचा दुपट्टा टाकुन त्यांचे स्वागत केले.यावेळी नागभीड तालुका काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष प्रमोद चौधरी, उपाध्यक्ष रमेश ठाकरे, नागभीड न.प.काँग्रेस गटनेते संजय अमृतकर, चिमुर विधानसभा युवक महासचिव अमोल वानखेडे, तळोधी गोविंदपूर जि.प.काँग्रेसचे सद्स्य बल्लु गेटकर, तळोधी ग्रा.पं.सद्स्य विलास लांजेवार,डोनूजी पाकमोडे, विजयाताई वाढई, वंदनाताई चचाणे, ज्योतीताई मडावी, रेखाताई मेश्राम, नागभीड न.प.समन्वयक हरिष मुळे, वाकर्ला सरपंच दिनकर सिंगारे, किशोर समर्थ, तसेच आदी काँग्रेस कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. या पक्ष प्रवेशाभुळे तळोधीच्या राजकारणात वेगळीच कलाटनी मिळणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे.