कारंजा (लाड) : काल पासून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या अमृत महोत्सवाला , कारंजा बसस्थानक येथे प्रारंभ करण्यात आला. ( राज्य परिवहन बससेवा आज रोजी ७४ वर्षाची झाली ७५ व्या वर्षात पदार्पण झाले आहे . ) यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सहाय्यक वाहतूक अधिक्षक पी डी डायलकर हे होते तर उद्घाटक म्हणून प्रमुख पाहुणे ज्येष्ठ पत्रकार आणि कारंजा प्रवासी मंडळाचे संयोजक संजय कडोळे, विशेष अतिथी पत्रकार आरिफ पोपटे व मोहम्मद मुन्निवाले हे होते . प्रारंभी प्रमुख अतिथी यांचे हस्ते दिपप्रज्वलन करण्यात येऊन कारंजा आगार व बसस्थानकाचे सहाय्यक कार्यशाळा अधिक्षक ए व्ही मानके, वाहतूक नियंत्रक संजय भिवकर, वाहक - चालक -कर्मचारी विजय अंदागोदे, सुभाष हळदे, मोहम्मद जाकीर, सौ वर्षा भुसाटे, अमोल राठोड, संतोष राठोड, डी एम व्यवहारे, रोशन मोहोड, अजिम चौधरी, जमीर खान, व्यवहारे पाटील यांचे हस्ते प्रमुख अतिथी संजय कडोळे, आरिफ पोपटे, मोहम्मद मुन्निवाले, कैलाश हांडे व प्रवाशाचा सत्कार करण्यात आला . याप्रसंगी प्रमुख अतिथी संजय कडोळे म्हणाले की, "राज्य परिवहन महामंडळाची बस म्हणजे संपूर्ण राज्यातील खेड्यापाड्यांना एकत्र जोडणारी जीवन वाहिनी आहे . आज संपूर्ण देशात महाराष्ट्र राज्याची बससेवा प्रथम क्रमांकाची असून याचे श्रेय वाहक चालक कामगार कर्मचाऱ्यांना जाते . तसेच याप्रसंगी त्यांनी मागणी केली की, सध्या मुर्तिजापूर मार्गे अकोला मार्ग व्यवस्थित नसल्याने कारंजा आगराने दिवसातून कमीत कमी तिन गाड्या पिंजर - बार्शिटाकळी मार्गाने अकोला जाणे करीता सोडल्या पाहीजेत." आपल्या अध्यक्षीय भाषणातून बोलतांना, प्रवाशाच्या सहकार्याने महामंडळाची बससेवा अमृत वर्षात पदार्पण करीत असून याचे सर्वस्वी श्रेय महामंडळावर विश्वास ठेवून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे आहे . " त्यानिमित्ताने बस आगाराचे वतीने पी डी डायलकर यांनी वर्धापनदिनाच्या सर्व प्रवाशांना शुभेच्छा दिल्या .कार्यक्रमाचे आभार संजय भिवकर यांनी केले .