पुणे भूगोल शिक्षक संघातर्फे इयत्ता सातवी व इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या भूगोल प्रज्ञाशोध परीक्षा आणि निबंध स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ प्रा.डॉ.श्रीराम पानझाडे सहसंचालक शिक्षण संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते करण्यात आला. स्पर्धेत प्रथम, द्वितीय,तृतीय क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांना या कार्यक्रमात गौरविण्यात आले. प्रा.डॉ.श्रीराम पानझाडे म्हणाले, \"प्रज्ञाशोध परीक्षा, निबंध स्पर्धा यासारख्या उपक्रमांमध्ये अधिकाधिक विद्यार्थ्यांनी - शिक्षकांनी सहभागी व्हावे.मुलांपेक्षा मुलींची संख्या बक्षीस मिळविण्यामध्ये अधिक आहे. मुलींचे विशेषता त्यांनी कौतुक केले. भूगोल संघाच्या उपक्रमाचे कौतुक केले व संघाला त्यांनी शुभेच्छा दिल्या.
पुणे भूगोल शिक्षक संघाच्या अध्यक्षा अलका काळे, उपाध्यक्षा संध्या माने, कार्यवाह विष्णू मोरे, सुवर्णलता काळे, विनोद वाघ, सुचिता खुणे, कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका माया कोथळीकर, सारिका घारे- जगताप, पाटील उपस्थित होते.
भूगोल प्रज्ञाशोध परीक्षा (इयत्ता नववी)
प्रथम क्रमांक- कृपा मारणे {अहिल्यादेवी हायस्कूल}
द्वितीय क्रमांक - समृद्धी नाईक {महिलाश्रम हायस्कूल}
तृतीय क्रमांक( विभागून )-
शर्वरी गायकवाड {सुंदरबाई मराठे विद्यालय खराडी}
रुद्र वाघमारे { चिंतामणी माध्यमिक विद्यालय आंबेगाव}
भूगोल प्रज्ञाशोध परीक्षा (इयत्ता सातवी)*
प्रथम क्रमांक- आकांक्षा मस्के {रेणुका स्वरूप हायस्कूल}
द्वितीय क्रमांक:- सौंदर्या दुधाम {रेणुका स्वरूप हायस्कूल}
तृतीय क्रमांक (विभागून) :-
जेबा शेख {संत तुकाराम माध्यमिक विद्यालय}
मनस्वी गायकवाड {संत तुकाराम माध्यमिक विद्यालय}
विशेष पारितोषिक ०८ विद्यार्थ्यांना देण्यात आले.
विद्यार्थी निबंध स्पर्धा
प्रथम क्रमांक :- अक्षरा येरगुंटला (नववी) - {महिलाश्रम हायस्कूल}
द्वितीय क्रमांक:- रेवती पुटागे- (दहावी)- युनिक इंग्लिश मीडियम स्कूल
तृतीय क्रमांक:- भक्ती मुंडे - { गर्ल्स इंग्लिश मीडियम स्कूल }
शिक्षक निबंध स्पर्धा
संजीवनी जगताप {पी.ई.एस.मॉडर्न गर्ल्स हायस्कूल}
द्वितीय क्रमांक - प्रतिभा कडेकर {डॉ. सायरस पूनावला हायस्कूल } गुणवंत भूगोल शिक्षक पुरस्कार सई नेरलेकर एच. एच. सी. पी. हुजूरपागा, लक्ष्मी रोड, पुणे यांना गुणवंत भूगोल शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
इयत्ता सातवीचा भूगोल प्रज्ञाशोध परीक्षेचा निकाल ७६.१, तर इयत्ता नववी चा निकाल 80.13% लागला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद वाघ यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघाच्या अध्यक्षा अलका काळे यांनी तर आभार कार्यवाह विष्णू मोरे यांनी मानले.
विष्णू मोरे,
कार्यवाह,
पुणे भूगोल शिक्षक संघ, पुणे.
आपल्या प्रतिक्रिया द्या....