वाशिम - आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत "मेरी माटी मेरा देश" या उपक्रमामध्ये जिल्हास्तरीय अमृत कलश यात्रा दिलेल्या मार्गदर्शक सुचनेनुसार आज, १७ ऑटोंबर रोजी सकाळी ९ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथून सुरुवात करण्यात आली. त्यामध्ये प्रामुख्याने नगर पालीका प्रशासनाच्या वतीने जिल्हयातील वाशिम, कारंजा, रिसोड, मालेगाव, मानोरा, मंगरुळपीर येथील शहरी भागातील अमृत कळस तर तालुकास्तरीय अमृत कळस यामध्ये त्या त्या शहरातील माती आणण्यात आली ती एका मोठ्या कळसामध्ये जिल्हाधिकारी यांच्या हस्ते एकत्र करण्यात आली.

सदर यात्रेची सुरुवात जिल्हाधिकारी कार्यालय येथून जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेच्या सिईओ वसुमना पंत, निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, उपजिल्हाधिकारी कैलास देवरे, उपजिल्हाधिकारी नितीन चव्हाण, नगर पालीका प्रशासन अधिकारी पंकज सोनुने, जि.प. उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिगांबर लोखंडे, जिल्हा पुरवठा अधिकारी तेजश्री कोरे, बिडीओ प्रफुल्ल तोटावार, रिसोड मुख्याधिकारी सतिश शेवदा, कारंजा मुख्याधिकारी दिपक मोरे, कर अधिक्षक बाळकृष्ण देशमुख, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी राजेश वझीरे, अभियंता अशोक अग्रवाल, सभा अधिक्षक उज्वल देशमुख, राहुल मारकड, गजानन हिरेमठ, नितीन जाधव, सुरेश बैरवार, कुणाल कनोजे, अमोल कापसे, रविंद्र सोनुने, न.प. महात्मा गांधी विद्यालयाचे विद्यार्थी, विद्यार्थीनी, शिक्षक, शिक्षीका तसेच नेहरु युवा केंद्राचे स्वयंसेवक, नगर परिषदेचे कर्मचारी आवर्जूृन उपस्थित होते. सदरहु कलश यात्रा जिल्हाधिकारी कार्यालयापासून सिव्हील लाईन, डॉ. बी.बी. देशमुख दवाखान्यासमोरुन नगर परिषद टेंपल गार्डन येथे समाप्त झाली. याठिकाणी जिल्हाधिकारी यांच्या हस्ते अमृत वाटीका येथे वृक्षारोपण करुन तसेच नगर परिषद वाशिमकडून शहीदांच्या स्मृतींना नमन करुन पुष्पचक्र अर्पण करण्यात आले.

सदर अमृत कळसामधील एकत्रित केलेली माती जिल्हास्तरीय कळस तयार करुन २६ ऑटोंबर रोजी मुंबई येथे कार्यक्रमप्रसंगी नेण्यात येणार आहे. यावेळी उपस्थितांचे आभार उज्वल देशमुख यांनी मानले.
आपल्या प्रतिक्रिया द्या....