कारंजा : गुरुवार दि २५ मे पासून रोहीणी नक्षत्र प्रारंभ झाले असतांनाही यावर्षी तापमानाने उच्चांकच गाठलेला होता व त्यामुळे नागरीकांना उकाडयाने कमालीचे बेजार केले असल्याचे दिसून येत होते. वातावरणात मात्र बदल होण्याची कोणतीही चिन्हे दिसतच नव्हती . मात्र अशातच रविवारी दि ४ जून रोजी दुपारी 3 : 30 नंतर वातावरणात अचानक बदल होऊन वावटळ सदृश्य वातावरणातच ढगांचा गडगडार नी विजांचा लखलखाट सुरु झाला . आणि जवळपास तासभर तरी रोहीणीच्या पावसाच्या सरी हळूवार पणे कोसळत होत्या त्यामुळे काही प्रमाणात का होईना नागरिकांना उकाडया पासून दिलासा मिळाला. मातीच्या बहारदार सुगंधाने वातावरणात प्रसन्नता निर्माण झाली . "रोहीणी मृगाच्या बहीणी" म्हणून ओळखल्या जात असून रोहीणीत पावसाच्या सरी कोसळल्यास पावसाळा चांगला होतो असे जुन्या जाणत्या वयोवृद्धाचे मत असते. मात्र आज रविवार बाजार होता. अचानक बदलेल्या वातावरणाने व आलेल्या पावसाने बाजारात असलेल्या ग्राहकांची व सोबतच लघु व्यावसायिकाची तारांबळ उडाल्याचे दिसून येत होते . शिवाय काही काळ विद्युत पुरवठा खंडीत झाल्याने नागरीकांचे हाल झाल्याचे दिसून आले असे वृत्त प्रत्यक्षदर्शी पत्रकार संजय कडोळे यांनी कळवीले आहे .