ब्रम्हपुरी तालुक्यातील बरडकिन्ही येथील रहिवासी असलेल्या रेखा सुनिल गुनुरकर यांच्या घरी शाॅट सर्किट झाल्यामुळे घरातील कपडे, विद्युत लाईनची फिटींग व इतर घरगुती सामान जळुन खाक झाले. यामध्ये सदर महिलेचे फार मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे.
सदरची बाब बरडकिन्ही येथील ग्राम काॅंग्रेस कमेटीच्या पदाधिकाऱ्यांनी राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, आमदार विजय वडेट्टीवार यांना कळवताच त्यांनी सदर आपदग्रस्त महिलेला आर्थिक हातभार लागावा म्हणून आपल्या स्वतः कडून आर्थिक मदत पाठवली.
सदरची आर्थिक मदत देतांना तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, ग्राम काॅंग्रेस कमेटीचे अध्यक्ष भास्कर गोटेफोडे, सरपंच मनोज बन्सोड, युवक काँग्रेस बरडकीन्हीचे अध्यक्ष दिपक गोटेफोडे, चकबोथली येथील शिवाजी नखाते, ग्रामपंचायत सदस्य व इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.