दिवसा झाळूच्या माध्यमातून स्वच्छता करून रात्री कीर्तनाच्या माध्यमातून लोकांच्या अंधश्रद्धा दूर करणारे खरे लोकसंत कर्मयोगी गाडगे महाराज यांची जयंती अकोला महानगरातील बिरला गेट परिसर व मलकापूर परिसरातील महानगरपालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सत्कार सन्मान करून साजरी करण्यात आली. सर्वप्रथम मलकापूर येथील गाडगे महाराज पुतळ्याला पूजन व हाराअर्पण अभिवादन करण्यात आले. त्यानंतर अकोला महानगरामध्ये स्वच्छतेचे काम करीत असलेले मनपाचे स्वच्छता कर्मचारी यांचा भगव्या शाल ,श्रीफळ ,पुष्पगुच्छ गोड पदार्थ देऊन तर महिलांचा साडीचोळी देऊन त्यांचा मानसन्मान सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाजसेविका कमलजीत कौर ह्या होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून नगरसेवक मंगेश काळे, समाजसेवक गजानन हरणे, नंदकिशोर गावंडे, प्रमोद धर्माळे, अविनाश मोरे, युवासमाजसेवक केल्विन सुबी,समर्थ गुप्ता, आदि मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या हस्ते स्वच्छता कर्मचारी यांचा सत्कार सन्मान करण्यात आला.
हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरता निर्भय बनो जण आंदोलन तसेच नगरसेवक मंगेशभाऊ काळे मित्र परिवार यांच्यासह सुनीता करीया,शारदा माप्रीरे,मंगला सरपण, चांदाबाई खराटे,कालीचरण लाडोरे,विजय धामणे,मेहेद कांकिया,राजेश जरिया,कृष्णा मेमसर आदिनी केले.