विरुर : डोंगरगाव डॅम मध्ये पाण्यात बुडून एका व्यक्तीचा मृत्यू माहिती मिळाल्या प्रमाणे रुपेश खंडेराव कुलसंगे राहणार टेबुरवाही येथील रहिवासी असून सध्या सावनेर अगार मध्ये चालक तथा वाहक या पदावर कार्यरत होते, आपले मित्रा सोबत डोंगरगाव डॅम पाहण्याकरिता गेले असता पाण्यात उतरून वेश्ट वेअर कडे जाताना पाण्याचा प्रवाह वाढल्याने रुपेश खाली पडून खड्यात पडल्याने त्यांचा मृत्यू झाला व त्याचे शव आता पर्यंत मिळाले नसून त्यांचे शोध घेणे सुरू आहे, रुपेश यांच्या मृत्यूने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.