तुमसर शहरात रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास विनोबानगर व गोवर्धन नगरात पाच घरफोड्यांच्या घटना घडल्या. त्यात सुमारे दोन लाखांचे ऐवज लंपास केले. पंधरा दिवसांपूर्वी याच परिसरात घरफोडी झाली होती. चोरट्यांची टोळी मध्य प्रदेशातील असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. तुमसर शहरात मागील काही दिवसांपासून घरफोडीचे सत्र सुरू असल्याचे दिसून येते. तुमसर पोलिसांनी शहरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरट्यांच्या हालचाली संशयास्पद आहे.