देसाईगंज: बल्लारपूर सेवा समिती, बल्लारपूर द्वारा संचालित स्थानिक मोहसीनभाई जव्हेरी महाविद्यालयात थोर शास्त्रज्ञ, नोबल पारितोषिक विजेते डॉ. सी. व्ही. रमण यांच्या रमण एफेक्ट या शोधनिबंधाला मिळालेल्या नोबेल पारितोषिकाच्या सन्मानार्थ राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला.
या प्रसंगी अध्यक्ष स्थानी डॉ. सुनील चौधरी, प्रमुख अतिथी म्हणून डॉ. आशिष सेलोकर तथा डॉ. चंद्रकांत शेंडे आदींची उपस्थिती होती.
राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांकरिता विज्ञान मंच च्या वतीने पोस्टर स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.
प्रास्ताविक प्रा. श्रीकांत धोटे यांनी तथा आभार प्रदर्शन प्रा. झोया सय्यद यांनी केले. या प्रसंगी प्रा. आशिष डोंगरवार, प्रा. हर्षा डोंगरवार, तथा श्री. कपिल ढोरे आदींचा सहभाग होता.