ब्रम्हपुरी- २० च्या आतील पटसंख्येच्या शाळा बंद करण्याचा निर्णय झालेला आहे, व त्या मध्ये ब्रम्हपुरी तालुक्यातील १७ शाळा आहेत,त्यामधील १ शाळा मौजा तुलानमेंढा येथील आहे, पंरतु या संख्या पटसंख्या मागील १० वर्षापासून कधीही २० च्या खाली आलेली नाही आहे,व आजही शाळेची पटसंख्या २० च्या वरच आहे,त्यामुळे तुलानमेंढा शाळेचे नाव पूर्णपणे चुकीने आलेले असून या शाळेचे नाव यादितून वगळून शाळा बंद करू नये, आणि जर शाळा बंद करण्यात आली तर सर्व गावकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करतील,असा इशारा प्रशासनाला निवेदनातून देण्यात आला.
निवेदन देताना शाळा व्यवस्थापन समितिचे अध्यक्ष श्री धनराज नंदेश्वर,कु आशिष शेंडे,संजयजी दलाल,अतुल मसराम,व गावकरी उपस्थित होते.