वाशिम :
23 एप्रिल रोजी संपूर्ण जगभरात जागतिक पुस्तक दिन साजरा केला जातो. या दिवशी पुस्तकांचे महत्त्व अधोरेखित केले जाते. पुस्तके ही माणसाची खरी आणि सच्ची मित्र असतात. ती आपल्याला ज्ञान, विचार आणि नवनवीन कल्पनांचा खजिना उघडून देतात. पुस्तकाच्या संगतीत राहणारा व्यक्ती कधीच एकटा नसतो. पुस्तके आपल्याला जगण्याची दिशा देतात, संस्कार करतात आणि आपल्याला अधिक चांगले व्यक्तिमत्व घडवायला मदत करतात. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी वाचनाची सवय ठेवली पाहिजे.
आजच्या डिजिटल युगात पुस्तके आणि वाचनाची गरज अधिक वाढली आहे. मोबाईल आणि इंटरनेटच्या गर्दीतही पुस्तक वाचण्याची सवय टिकवणे ही काळाची गरज आहे.
जागतिक पुस्तक दिनानिमित्त आपण सर्वांनी एक संकल्प केला पाहिजे की, दररोज किमान १५ मिनिटे वाचन करणार आणि इतरांनाही वाचनासाठी प्रेरित करणार.पुस्तके म्हणजे ज्ञानाचा अथांग सागर. जीवनात यशस्वी, सुजाण, आणि सुसंस्कृत होण्यासाठी पुस्तके अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. लहानपणापासून माणूस पुस्तकांच्या माध्यमातून शिकतो, समजतो आणि वाढतो.ज्ञानाचे साधन पुस्तके आपल्याला शैक्षणिक, सामाजिक, नैतिक आणि व्यावसायिक ज्ञान पुरवतात.चिंतन व विचारशक्ती वाढवते चांगली पुस्तके आपल्याला विचार करायला शिकवतात.मनोरंजनाचे साधन: कथा, कादंबऱ्या, आत्मचरित्रे यामुळे पुस्तक वाचन मनाला शांतता व समाधान देते. संस्कार आणि मूल्ये: धार्मिक, नैतिक आणि प्रेरणादायी पुस्तकांमधून जीवनातील खरे मूल्य शिकायला मिळते.स्वत:ला ओळखण्याचा मार्ग: आत्मपरिचय, आत्मविश्वास आणि जीवनाचा अर्थ शोधण्यास मदत करतात.स्वामी विवेकानंद "वेदान्त के प्रकाश में जीवन" किंवा "My Master" सारख्या पुस्तकातून त्यांनी आत्मविश्वास, देशसेवा, व आध्यात्मिक जागृतीवर भर दिला.
त्यांचं मत होतं की, "एक पुस्तक जे तुमच्या मनाला जागं करतं, ते हजार पुस्तकांपेक्षा श्रेष्ठ आहे."
महात्मा गांधी "माझा सत्याचा प्रयोग" (The Story of My Experiments with Truth) या आत्मचरित्रातून त्यांनी स्वतःच्या विचारांचा व जीवनपद्धतीचा सखोल परिचय करून दिला. त्यांचं मत होतं की वाचन हे आत्मपरीक्षणाचे साधन आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर
त्यांनी "Annihilation of Caste" व "Who Were the Shudras?" सारख्या पुस्तकांतून समाजव्यवस्थेवर कठोर पण सत्य भाष्य केले.
वाचन आणि लेखन हे परिवर्तनाचे शक्तिशाली माध्यम असल्याचे त्यांचे मत होते. त्यांनी एकदा म्हटले होते: "Educate, Agitate, Organize."
सांगितले आहे. एवढेच कयतर संत तुकाराम त्यांच्या अभंगरचनेतून त्यांनी समाजाला भक्तीमार्ग, सद्वर्तन आणि आत्मज्ञान दिले."वाचाल तर वाचाल" हा त्यांचा प्रसिध्द संदेश – वाचनातूनच मोक्षाचा मार्ग दिसतो.
संत ज्ञानेश्वर "ज्ञानेश्वरी" हे भगवद्गीतेचे अजरामर भाष्य – त्यांनी अत्यंत सोप्या भाषेत आध्यात्मिक विचार मांडले. ते म्हणतात: "आळसाची गुरुस्ती केली पाहिजे, ज्ञान हाच खरा धर्म आहे."संत एकनाथ "भागवत", "रुक्मिणीस्वयंवर", आणि अनेक भारुडांमधून जीवनमूल्ये व भक्तीभाव सांगितले. ते म्हणतात: "वाचन, श्रवण, मनन, चिंतन – हीच खरी साधना." पुस्तके म्हणजे मानवतेचा अमूल्य ठेवा. ती फक्त कागदावर छापलेले शब्द नसतात, तर ते अनुभव, विचार, आणि ज्ञानाचे सार असते. जीवनात अनेक वेळा आपल्याला अडचणी, संकटं, शंका आणि प्रश्न यांचा सामना करावा लागतो. अशा वेळी एखादं चांगलं पुस्तक आपल्याला योग्य दिशा दाखवतं. वाचनाने माणसाची शब्दसंपत्ती वाढते, विचारप्रक्रिया विकसित होते आणि आत्मविश्वासही बळकट होतो. शाळा, महाविद्यालये ही ज्ञान मिळवण्याची साधने असली, तरी खरी मैत्री पुस्तकांशी करायला हवी. ही मैत्री आपल्या आयुष्याला अधिक सुंदर आणि अर्थपूर्ण बनवते.
आजच्या काळात सोशल मीडियावर तासन् तास घालवण्यापेक्षा रोज काही वेळ वाचनाला द्यायला हवा. एक चांगलं पुस्तक अनेक वेळा तुमचं आयुष्य बदलू शकतं. प्रतिपादन जिल्हा युवा पुरस्कार प्राप्त महाराष्ट्र शासन तथा अध्यक्ष नेहरू युवा बहुउद्देशीय मंडळ केकतउमरा,सामाजिक कार्यकर्ते प्रदीप पट्टेबहादूर यांनी आज जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने केले आहे.
आपल्या प्रतिक्रिया द्या....