कारंजा : कारंजा नगरीचे ज्येष्ठ काँग्रेस नेते,माजी नगराध्यक्ष अरविंदजी लाठीया यांच्या मार्गदर्शनात,कारंजा जेसीज क्रीडा संकुलावर, काँग्रेसच्या ज्येष्ठ व युवक उत्साहित काँगेस कार्यकर्त्यांना, एकत्रित करून एका छोटेखाणी पारिवारिक (कौटुंबिक) कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात येऊन, कॉंग्रेसचे निर्भिड युवा नेते,अ.राजीक शेख यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. सोबतच नवनिर्वाचित पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी सहकारनेते सुनील पाटील धाबेकर हे होते. तसेच व्यासपिठावर सत्कारमूर्ती नवनिर्वाचित तालुका काँग्रेस अध्यक्ष तथा उंबर्डा (बाजार)चे सरपंच राज चौधरी,नवनिर्वाचित राष्ट्रवादीकाँग्रेस (शरद पवार गट) शहराध्यक्ष हाजी रऊफ मामु ,प्रमुख पाहुणे ऍड.फारुख शेख, माजी न प उपाध्यक्ष जुम्माभाई पप्पूवले,प्रकाशआप्पा निंबलकर, उपस्थित होते.
यावेळी पुष्पगुच्छ देऊन व्यासपिठावरील मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी नगराध्यक्ष कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अरविंद लाठीया यांनी केले.त्यांनी आपल्या प्रास्ताविकातून , तरुण व सच्च्या कॉंग्रेस कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविण्याकरीता अशा छोट्या मोठ्या कार्यक्रमाची आवश्यकता असल्याचे सांगून, युवा कार्यकर्त्याचा गुणगौरव करून,प्रोत्साहन दिले.
नवनिर्वाचित काँग्रेसचे तालुका अध्यक्ष व सरपंच राज चौधरी यांचा सत्कार शाल, पुष्पगुच्छ देऊन सहकार नेते सुनील पाटील धाबेकर यांच्या हस्ते करण्यात आला. हाजी रउफ मामु राष्ट्रवादी काँगेस (शरद पवार गट)यांचा प्रकाश आप्पा निंबलवार व जुम्माभाई पप्पुवाले माजी उपाध्यक्ष न.प. कारंजा यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन त्सत्कार केला. तसेच कार्यक्रमाचे आकर्षक तथा केंद्र बिंदू अ.राजीक शेख यांचा सत्कार सहकारनेते सुनील धाबेकर व मंचकावरील सर्व उपस्थितांकडून शाल पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला.
नंतर अनेक मान्यवरांनी आपल्या संभाषणातून शुभेच्छा दिल्या.अध्यक्षीय भाषणात सहकार नेते सुनील धाबेकर यांनी सत्कार मूर्तीचा गुणगौरव करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाला सुर्यकांत जीरापुरे,रवींद्र शहाकार, वानखडे गुरुजी ,रामबकस डेंडुले,गवली समाज ज़िला अध्यक्ष जुम्माभाई बन्दूकवाले, रोमिल सेठ लाठिया ,डॉ ज्ञानेश्वर गरड ,अताउल्लाह खान , अक्षय बनसोड़ ,प्रफुल गवई ,दिलीप रोकड़े, रफत काज़ी , अशोक सेठ, ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे, पत्रकार उमेश अनासने ,संदीप गुल्हाने, महेश गजभिये, गजानन जधव,राजू आडे ,रवि पंजवानी, तौसीफ खान, सरफ़राज़ खान ,प्रशांत कराळे, सुमित भगत, जमील खान , तौसीफ खान, लियाकत मुन्नीवाले, अनसार भाई, छगन भाऊ वाघमारे ,सचिन खांडेकर, जुबेर खान, कौसर भाई ,फ़िरोज़ प्यारेवाले ,यूसुफ मुन्नीवाले ,आवेज़ अहमद, चाँद भाई , सैयद जवेद ,ऐतेशम काज़ी, सलीम खान शमी भाई ,अब्दुल वासिम, नूर मोहम्मद महबूब खान, नावेद अहमद , राजा भाई कबीर अहमद ,आसिम शेख रय्यान शेख़ ,इब्राहिम भाई महोमद भाई देशभ्रतार, इर्शादभाई, शाम जाधव विलास डोंगरे,गोपाल काजे, योगेंद्र जामणिक सागर जामणिक विकास धुर्वे,व असंख्य कार्यकर्ते हजर होते. कार्यक्रमाचे शेवटी अरविंद लाठीया यांनी प्रमुख पाहुणे व उपस्थितांचे आभार मानले.अल्पोपहाराने कार्यक्रमाची सांगता झाली.
आपल्या प्रतिक्रिया द्या....