वाशिम : सध्या संपूर्ण वाशिम जिल्ह्यात,ग्रामिण भागातील प्रत्येक खेडोपाडी आणि कारंजा शहरात,विज वितरण कंपनीच्या अरेरावी आणि मनमानी कारभाराने शहरी भागात तासनतास तर ग्रामिण भागातील प्रत्येक खेडोपाडी रात्र रात्रभर अघोषीत भारनियमन सुरु असल्यामुळे नागरिकांना रखरखत्या उन्हाळ्यात प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागत असल्याने त्यांच्या अंगाची लाही लाही होत असून,घामाच्या धारांनी त्यांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याने विजेच्या लपंडावाचा चांगलाच फटका बाळ बाळतींन, दुर्धर आजारग्रस्त,दिव्यांग,ज्येष्ठ वयोवृद्ध यांना बसत असून अक्षरशः त्यांचे आयुष्यमान विज भारनियमनामुळे कमी कमी होत चाललेले आहे. मात्र याविषयी कोणताच पुढारी,खासदार, आमदार किंवा राजकिय पक्ष विज वितरण कंपनीला जाब विचारतांना दिसत नाही.त्यामुळे जिल्ह्यातील ग्राहक राजा संतापला आहे.आज रुग्नालयातील सर्व मशनरी, लाईट,घरातील पंखे,एअर कंडीशनर,वॉटर कुलर,कुलर,फ्रीज,स्वयंपाक घरातील यंत्र विजेवर अवलंबून असून दहा मिनटं जरी विज नसली तरी सर्वत्र अंधःकाराचे अधिराज्य पसरते आणि घड्याळाचा काटा स्थिरावल्याप्रमाणे वाटतो.मात्र असे असतांनाही ग्राहक राजाच्या त्रासाचा जराही विचार न करता विज वितरण कंपनीच्या मनमानी कारभाराने प्रत्येक दिवशी दिवसातून दहाबारा वेळा कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक विज पुरवठा बंद करण्यात येत आहे.आज वैशाखाच्या तिव्र उन्हाने शहरात आणि खेडोपाडी संचारबंदी सदृश्य परिस्थिती उद्भवलेली असतांना,उष्माघातापासून स्वतःला आणि कुटुंबातील लहान थोरांना वाचविण्याकरीता मनुष्य स्वतःला घरातच कोंडून ठेवत आहे.मात्र विज पुरवठा वारंवार खंडीत होत असल्याने त्याला स्वतःच्या घरातही विश्रांती घेत येत नसल्याने "इकडे आड तिकडे विहीर" सारखी माणसाची दुर्दशा होत आहे.आता लवकरच मान्सूनचे आगमन होणार असून पावसाळा प्रारंभ होणार आहे.व पावसाळ्याच्या प्रारंभी मुख्यतः चक्रवात,वारे वादळ,पाऊस होऊन नैसर्गिक आपत्ती मुळे विजेच्या तारा तुटणे,विजेचे खांब पडणे,डी पी,ट्रॉन्सफॉर्मर उडणे यासारख्या घटना घडत असतात. व त्यामुळे विजपुरवठा खंडीत होत असतो तरी याची दखल घेऊन स्थानिक खासदार, आमदारी,पुढारी,पत्रकार यांनी यासंदर्भात कार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी यांना अवगत करावे व त्यांनी बारकाईने लक्ष्य देऊन अखंड विज पुरवठा करण्यात येणाऱ्या अडचणी तातडीने दूर करून व सर्व यांत्रीक दुरुस्त्या करून,व्याजासह दुप्पट तिप्पट रकमेची विद्युत देयके दरमहा वेळेवर भरणाऱ्या लाखो-करोडो ग्राहकांच्या अडचणी दूर कराव्यात व विज पुरवठा खंडीतच होऊ नये याची दक्षता घेऊन कायमस्वरुपी अखंड विज पुरवठा करण्याची कृपा करावी अशी मागणी वाशिम जिल्हा वासियांकडून तसेच कारंजेकराकडून होत असल्याचे महाराष्ट्र शासन पुरस्कार विजेते दिव्यांग जनसेवक संजय कडोळे यांनी कळविले आहे.