अकोला:-
भारतीय कम्युनिस्ट पक्ष अकोला कार्यालयात दुपारी. १ वा. कॉ. रमेश गायकवाड जेष्ठ कामगार नेते यांच्या हस्ते ध्वजारोहण करुन सभा घेण्यात आली सभेत अकोला भारतीय कम्युनिस्ट पक्ष अकोल्याचे सहसचिव कॉ. नयन गायकवाड मार्गदर्शन करीत म्हणाले की २५ डिसेंबर १९२५ रोजी लाल बावटा कम्युनिस्ट पक्षाचा भारतात उदय झाला आणि लाखो शेतकरी शेतमजुर कामगार कष्टकरी श्रमिकांना भारतीय कम्युनिस्ट पक्ष आशेचा किरण दिसला. पुढे ह्या लाल बावट्याखाली हजारों निस्वार्थी निर्भीड झुंजार वृत्तीचे लढाऊ कॉम्रेड तयार झाले आणि जणु काही त्यांनी विषमता विरोधात व भारताला स्वातंत्र मिळन्या करीता विडाच उचलला असंघटित शेतकरी शेतमजुर कामगार कष्टकरी श्रमिकांना संघटित करुन लढे निर्माण करुन गोवा मुक्ति आंदोलन, तेलंगाना मुक्ती आंदोलन, भारताच्या स्वातंत्र करिता हजारो पक्षाच्या कार्यकर्त्यानि आपला जिव गमावुन देशावर बलिदान होवुन अखंड भारताची निर्मिति करुण सर्व सामान्य माणसांना आपला संविधानिक हक्क मिळवुन दिला.
पण विषमता काहीं या भारतातून निघालेली नाही आहे अदानी, अंबानी, व इतर कॉप्रेट संस्थेचे कर्ज माफ होतात मात्र सर्व सामान्य शेतकरी व शासकीय, निमशासकीय विभाग, नगरपालिका, महापालिका व खासगी उद्योग आस्थापनांमध्ये अंगणवाडी कर्मचारी, आशा कर्मचारी, शालेय पोषण आहार कर्मचारी, MIDC कामगार, कृषी विद्यापीठ, घरेलु कामगार, हंगामी, कंत्राटी, रोजंदारी व मानधनावरील, राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी अधिकारी, कर्मचारी, उमेद कर्मचारी, ग्रामरोजगार सेवक, मनरेगा कंत्राटी कर्मचारी यांचे प्रश्न तसेच राहतात आहे या करीता शताब्दी वर्षा निमीत्त कुटुंब मेळावे घेवुन जगात अमीर अजून अमीर होत आहे मात्र सामान्य वर्ग गरिबीच्या दलदलीत जात आहेत ही भारतातून भांडवलदारी, विषमता व भारतीय कम्युनिस्ट पक्षाची सत्ता या भारतात व जगात आणन्या करीता आणि जगण्या साठी लढा.! लढण्या साठी जगा.!
आता जगण्या साठी लढून शासन प्रशासनाशी भांडवलदारांशी कडवी झुंज देऊन त्यांना त्यांचा न्याय हक्क मिळवुन द्यायचे आहे.
आज २६ डिसेंबर २०२२ रोजी आपन सर्वोच्च बलिदान, त्याग, अविरत, संघर्षाचे गौरवशाली ९८ व्या वर्षांचा वर्धापन दिन साजरा करीत आहो.
पुढे सन्मानाने आपल्या हक्का करीता जगण्या साठी लढावे लागेल आणि लढण्या साठी जगावे लागेल शेतकरी कामगारचे अनेक प्रश्न सोडविल्याने आज अनेक शेतकरी ,शेतमजुर, कामगार कष्टकरी श्रमिकांच्या खांद्यावर अभिमानाने भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा झेंडा फडकत आहे.असे कॉ. रमेश गायकवाड वर्धापन दिनात बोलत होते नंतर कॉ. नयन गायकवाड, कॉ. मायावती बोरकर, कॉ. सविता प्रधान, यांनी मार्गदर्शन केले.
या नंतर अनेक मान्यवरांनी आपले मत मांडले सभेचे संचालन कॉ. शालू नाईक यांनी केले. सभेत कॉ. रमेश गायकवाड, कॉ. नयन गायकवाड
कॉ. मायावती बोरकर, कॉ. सविता प्रधान, कॉ. छाया वारके , कॉ. संध्या गायकवाड , कॉ. पुनम खोब्रागडे , कॉ ज्योती गायकवाड , कॉ शालू ताई नाईक, कॉ. राजकन्या इंगळे, पोर्णिमा पाटील , सविता खिराडे
मंदा खडे, सुनिता भगत, शोभा गवई , सुरेखा पडघन, जयश्री गवई ,सुवर्णा घोडेस्वार, संगीता सुखदाने , निर्मला लवाळे , मीनाक्षी भगत, किरण साळुंखे , वंदना शिरसाठ , विद्या घायवट, प्रीती आंबेरकर, शीला शिरसाठ , प्रीती नायसे , सीमा गवई , वैशाली गुडधे , अर्चना गुडदे, शिल्पा गायकवाड , रंजना लोखंडे , अलका उन्हाळे , स्वाती हंबीर , प्रीती श्रीवास , सुवर्णा धनोकार , उषा इंगळे , रंजना लोखंडे , प्रीती देशमुख , रेवती जावरकर, रक्षा कठाणे , मनीषा बनसोडे , रोशनी कांबळे, ज्योती वानखेडे, नीता उघडे, आशा नवलकर, सुमय्या कौसर, अर्चना तडस , कमल खैरे , रूपाली अधनकर, उषा अहिर , राधा वाघमारे , प्रतिभा तायडे, शशिकला खडसान, संगीता, ज्योती नवले सह शेकडो पक्ष सभासद उपस्थित होते. अशाप्रकारे वर्धापन दिन साजरा करण्यात आला असे कॉ. स्वाती गायकवाड यांनी कळविले आहे..!
आपल्या प्रतिक्रिया द्या....