अकोला : महाराष्ट्र शासन पुरस्कार सामाजीक कार्यकर्ता व्यक्ती म्हणजे आपल्या समाजाचे भूषण असतो. समाजाप्रती आणि देशाप्रती असलेले त्यांचे भरीव योगदान आणि अतुल महत्कार्य बघूनच महाराष्ट् शासनाने अशा व्यक्तींची महाराष्ट्र शासन पुरस्कारार्थी म्हणून निवड करून त्यांच्या समाजाप्रती असलेल्या कार्याचा गुणगौरव केलेला आहे. हे लक्षात घेऊन अशा असामान्य व्यक्तीच्या अनुभवाचा लाभ नागरीकांना मिळावा म्हणून शासनाने अशा निष्पक्ष,निःस्वार्थी आणि समाजसेवी व्यक्तीची निवड शासकिय,निमशासकीय समित्यावर पदाधिकारी म्हणून करायला हवी.आणि त्याकरीता खासदार-आमदार-मंत्री-पालकमंत्री यांनी शिफारस करायला हवी. अशी मागणी,राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कारार्थी संघटना अकोलाचे संस्थापक प्रदेशाध्यक्ष अकोला आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कारार्थी संघटना जिल्हा शाखा : वाशिमचे जिल्हाध्यक्ष संजय कडोळे यांनी मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री,सचिव महाराष्ट्र शासन यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे.