कारंजा : संपूर्ण वाशिम जिल्ह्यात भाजपाला मजबूत पक्ष म्हणून बळकटी मिळवून देणारे, जिल्ह्यात भाजपाचे संघटन वाढवून हजारो लोकांचा इतर पक्षातून भाजपा पक्षात प्रवेश घडवून आणत,भाजपा पक्षाला कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघातून विजय प्राप्त करून देणारे आमदार स्व.राजेंद्र पाटणी यांचे दि.23 फेब्रुवारी 2024 रोजी उपचारा दरम्यान दिर्घ आजाराने मुंबई येथे अकाली निधन झाले.परंतू त्यापूर्वीच आमदार स्व.राजेंद्र पाटणी यांच्या मार्गदर्शनात त्यांचे सुपूत्र ॲड. ज्ञायक पाटणी यांनी भाजपाचे प्राथमिक सदस्य घेऊन भाजपा युवा नेते म्हणून,आपल्या वडिलांचा वारसा पुढे चालविण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली होती. स्व.राजेंद्र पाटणी यांच्या मृत्युच्या तिसऱ्याच दिवशी कारंजा मानोरा तालुक्यात अवकाळी पाऊस व प्रचंड गारपिटीच्या थैमानाने तालुक्यात हाहाकार झालेला असतांना,ॲड. ज्ञायक पाटणी यांनी स्वतःच्या वडिलांच्या मृत्युचे दुःख बाजूला ठेवून, तिसऱ्या चौथ्या दिवशीच,नुकसानग्रस्त शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन, गारपिट नुकसानीची पाहणी करीत,जिल्हाधिकाऱ्याकडे शेतकऱ्याच्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळवून देण्याची मागणी केली.तसेच शेतकऱ्यांना धिर दिला. तेव्हापासून पुढे कुठेही न थांबता कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघात त्यांनी सातत्याने सेवारत राहून आपला जनसंपर्क वाढवीला.व स्व.राजेंद्र पाटणी यांनी मंजूर करून आणलेली विकासकामे शासनाकडून पूर्णत्वास नेण्याकरीता मंत्रालयात वारंवार संपर्क ठेवून विकासकामे पूर्णत्वास नेली.त्यांच्या तरुण वयाच्या मानाने त्यांनी एखाद्या मुरब्बी नेत्यालाही लाजवेल अशाप्रकारे मतदार संघासाठी धडाडीने कामे केली.त्यांच्या कार्याने कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघातील मतदारांमध्ये उत्साह आणि नवचैतन्याचे वातावरण असून,भाजपाने त्यांना उमेद्वारी बहाल करण्याची मागणी होत आहे.तरी दुसरीकडे मात्र स्व. राजेंद्र पाटणी यांच्या मृत्युनंतर ॲड.ज्ञायक पाटणी यांच्या सक्रिय होण्याने आणि त्यांना मतदाराच्या मिळणाऱ्या पाठीब्यांने, काही नेत्यांचे मनसुबे मात्र धुळीला मिळत असल्याने त्यांच्या पोटात पोटशूळ उठत असल्याचे दिसून येत असून,त्यांची अस्तित्वासाठी धावपळ सुरू झालेली आहे.पूर्वीपासून असलेल्या गटबाजीला आता ऊत आला आहे.या परिस्थितीमुळे पक्षात बंडखोरी होण्याची शक्यता जरी असली,तरीही ॲड.ज्ञायक पाटणी यांनाच उमेद्वारी मिळण्याची दाट शक्यता आहे. व एकदा उमेद्वारी जाहीर झाली म्हणजे ॲड ज्ञायक पाटणी यांनी मनाचा मोठेपणा दाखवीत त्यांच्या वडिलांच्या सर्व कार्यकर्त्याना जवळ आणले आणि स्व.राजेंद्र पाटणी यांच्या इ.सन 2019 च्या निवडणूकीच्या रणनितीचे अनुकरण करून निवडणूक लढवीली तर त्यांच्या करीता निश्चितच ही निवडणूक जड न होता,सरळ आणि सोपी जाणार आहे.मात्र त्यासाठी ॲड ज्ञायक पाटणी यांना समाजात प्रत्येक व्यक्तींशी संवाद व संपर्क ठेवावा लागणार असल्याचे ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे यांनी म्हटले आहे.