कारंजा :- स्थानिक सरस्वती भुवन येथे दि. १८ एप्रिल रोजी संत शिरोमणी गोरोबा काका यांची पुण्यतीथी साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ज्ञानेश्वर शेंडोकार हे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून वनमालताई पेंढारकर तर प्रमुख अतिथी म्हणून संत शिरोमणी गोरोबा काका बहुउद्देशिय संस्था कारंजाचे अध्यक्ष अभिजित खोपे,सचिव रुपेश भागवत, सहसचिव सूर्यकांत खोपे, कोषाध्यक्ष प्रसन्न काळबांडे, सदस्या शालिनी मेहेरे इत्यादि मंचावर उपस्थित होते.
सर्वप्रथम मान्यवरांचे हस्ते दिपप्रज्वलन करून संत गोरोबा काकांच्या मुर्तीचे पुष्पहाराने पुजन करन्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सदस्य ज्ञानेश्वर मळवटकर यांनी केले.सदर कार्यक्रमामध्ये जेष्ठ वयोवृद्ध महिलेचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यान आला. तर श्रेष्ठ वयोवृद्ध समाज बांधवांचा सुद्धा शेला नारळ देऊन सत्कार करण्यात करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शक जेष्ठ समाजसेविका
श्रीमती वनमाला पेंढारकर यांनी महिला व जनसामान्यांच्या करीता केलेल्या समाज कार्याबददल शासनाचे वतीने अहिल्याबाई होळकर पुरस्कार देऊन मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते सत्कार करन्यात आला.म्हणून संस्थेच्या वतीने सुषमा काळबांडे यांच्या हस्ते शाल श्रीफळ व संत गोरोबा काकाची मूर्ति भेट देवून "सत्कार करन्यात आला. त्यावेळी त्यांनी समाज बांधवानी एकत्र येऊन काम करावे असे सांगीतले तसेच अध्यय भाषणातून ज्ञानेश्वर शेंडोकार यांनी संत गोरोबा काका यांचे जीवनाविषयी मार्गदर्शन केले व सर्व समाज बांधवानी कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थीत रहावे व समाजीक एकोपा असावा ते सुचविले.
सदर कार्यक्रमाचे संचालन संस्थेच्या सदस्या डफडे यांनी केले तर आभार शालीनी मेहेरे यांनी मानले.सदर कार्यक्रमांची सांगता महाप्रसादाने झाली. कार्यक्रमाचे यशस्वीते करीता संत शिरोमणी गोरोबा काका बहुउद्देशिय संस्थेचे सर्व पदाधिकारी, सदस्य तथा समाजबांधव व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.कार्यक्रमाला कुंभार समाजबांधव बहुसंख्येने उपस्थित होते.