नागभिड--खैरे कुणबी समाज संघटना तालुका नागभीड च्या वतीने सत्र २०२१-२०२२ मध्ये वर्ग १०वी च्या परीक्षेत ८०%आणि वर्ग १२ मध्ये ७५% गुण प्राप्त करून यश मिळविले त्या सर्व विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ,सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येत आले.यावेळी १० वी १२ वी च्या ४० विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला..
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि. प.चे माजी उपाध्यक्ष श्री.दिगांबर पाटील गुरपुडे तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री आतिशजी धोटे सर ब्रम्हपुरी, प्रमुख अतिथी म्हणून श्री संतोषजी रडके माजी पं.स.सदस्य नागभीड, संघटनेचे अध्यक्ष श्री मधुकर डोईजड,उपाध्यक्ष श्री.चक्रधरजी रोहणकर, माजी अध्यक्ष श्री.डॅनियल देशमुख उपस्थित होते..
यावेळी कार्यक्रमाचे मार्गदर्शक श्री.आतिषजी धोटे सर यांनी विद्यार्थ्यांना कष्ट करण्याची सवय ठेवा.कष्टातून चांगला अनुभव मिळतो.आपल्या जीवनातील स्वप्नांना कष्टाचं बळ द्या तसेच भविष्यातील स्पर्धा परीक्षा बाबत मार्गदर्शन केले असून पुढील देदीप्यमान यशासाठी त्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या आपल्यासाठी झटत असलेल्या मार्गदर्शकाना विसरू नका असा सूचक सल्ला दिला.
त्याचप्रमाणे श्री.संतोषजी रडके, दिगांबर पा.गुरपुडे पाटील,डॅनियल देशमुख,वैभव देशमुख यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले....
कार्यक्रमाचे संचालन श्री स्वप्नील नवघडे सर यांनी केले तर आभार श्री. देवाडे सर यांनी मानले.कार्यक्रमाला सर्व गुणवंत विद्यार्थी ,पालकवर्ग समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते,
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री.लूमदेव मोरांडे सर,श्रीराम घ्यार सर,हरीश मुळे,मनोज लडके,हरिदास वाकुडकर,सचिन बोपये,गिरीश नवघडे,प्रशांत पालपणकार,चेतन उरकुडे,श्रीनाथ पारखी,अविनाश ब्राम्हणकर, प्रमोद नवघडे यांनी सहकार्य केले .
आपल्या प्रतिक्रिया द्या....