तालुक्यात 15 जूनला झालेल्या कोतवाल भर्तीच्या परीक्षेत जवळपास 398 उमेदवार रिंगणात उतरले होते. त्यात बऱ्याच पैकी सुशिक्षित, स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी सुद्धा होते.
विद्यार्थ्यांनी परीक्षा क्रेंद्रावर झालेल्या गैर- गैव्यवहारप्रकरणी नाराजगी व्यक्त केली,व ह्या चर्चेला तालुक्यात चांगलेच उधाण आले.
परीक्षेत कोणत्याही प्रकारची पारदर्शीकता नसुन, एखाद्या विद्यार्थ्याने उत्तर पत्रिकेत चुक केली असेल, तर त्याला नवीन उत्तर पत्रिका कशी का दिली जाते?
प्रश्न पत्रिकेवर आणि उत्तर पत्रिकेवर डिजिटल कोड असायला पाहिजे. इतकंच नाही तर, प्रश्न पत्रिकेवर एकुण गुण व पेपर क्रमांक हे पेनाने वैक्तिक रित्या भरले आहे.
अशा अनेक घोडाला वाचा फुटली असुन कोतवाल भर्तीच्या उमेदवारां मध्ये तीव्र रोश दिसुन येत आहे.
ह्या समस्यांची माहिती रक्तविर सेना फाउंडेशनचे अध्यक्ष निहाल ढोरे यांना मिळताच तत्काळ उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री, महसूल मंत्री, पालकमंत्री व जिल्ह्याधिकारी चंद्रपूर जिल्हा यांना निवेदन देऊन कोतवाल भर्ती ताबळतोब रद्द करून पुन्हा नव्याने पारदर्शीकता ठेवून परीक्षा घेण्यात यावी. अशी मागणी करण्यात आली.
जर का कोतवाल भर्ती रद्द करून नव्याने परीक्षा घेतली नाही तर आमरण उपोषण करू असा तीव्र इशारा देण्यात आला.
यावेळी निवेदन देण्यासाठी रक्तविर सेनेचे उपाध्यक्ष मायासिंग बावरी, कोषाध्यक्ष प्रणय ठाकरे, सदस्य संदिप कामडी, सत्यपाल गोठे, जिल्हा कार्य प्रमुख, प्रज्वल जनबंधु, प्रविण कुथे, दिपक नन्नावरे, सतीश बनकर, स्वप्निल राऊत,गणेश बगमारे, करण सयाम, व तालुक्यातील सर्व कोतवाल भर्तीचे उमेदवार होते.