अकोला - अकोला जिल्हा सर्वोदय मंडळाचे पदाधिकारी व अन्वी मिर्जापुर येथील सामाजिक कार्यकर्ते अंबादास केशवराव वसु यांचे 6 सप्टेंबर रोजी दुःखद निधन झाले. अकोला जिल्हा सर्वोदय मंडळाचे वतीने अन्वी-मिर्झापूर येथे श्रद्धांजली सभा संपन्न झाली.ज्येष्ठ सर्वोदयी महादेवराव भुईभार,महाराष्ट्र सर्वोदय मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. शिवचरण सिंह ठाकुर,अकोला जिल्हा सर्वोदय मंडळाचे जिल्हाध्यक्ष बबनराव कानकिरड, महाराष्ट्र ग्रामदान मंडळाचे सदस्य महेश आढे यांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
अंबादास केशवराव वसु गेल्या यषपंचवीस तीस वर्षापासून सर्वोदय चळवळीशी जुळलेले आहेत. त्यांनी सर्वोदयाच्या माध्यमातून व्यसनमुक्ती ग्रामसफाई, ग्रामदान -ग्राम स्वच्छता अभियानात खूप योगदान दिले. आपले गाव स्वच्छ व सुंदर ठेवणे हीच अंबादास वसु यांना खरी आदरांजली ठरेल असे भावोद्द्गार महादेवराव भुईभार यांनी काढले. याप्रसंगी सर्व धर्म प्रार्थना व गीताई पठनाने मौन श्रद्धांजली वाहण्यात आली.सर्वश्री देविदास पाटील. सर्पमित्र प्रशांत नागे, मंगेश वसु, योगेश वसू यांचे सह ग्रामस्थांची उपस्थिती होती .