पुणे दि. धर्म रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचे अत्यंत विश्वासू असलेले सेवक आणि नाशिक येथील रामशेज किल्ल्याचे किल्लेदार वीर योद्धा गोविंद गोपाल गायकवाड यांची ३६३ वी पुणे अहमदनगर रोडवरील भीमा कोरेगाव येथून सात किलोमीटर अंतरावर असलेल्या वढू बुद्रुक ता शिरूर जिल्हा पुणे येथे बुधवार दि.१० ऑगस्ट २०२२ रोजी बहुजन जनता दल संस्थापक अध्यक्ष पंडित भाऊ दाभाडे यांच्या नेतृत्वाखाली बहुजन जनता दल पुणे जिल्हा शाखेच्या वतीने साजरी करण्यात आली
छत्रपती संभाजी महाराज आणि वीर योद्धा गोविंद गोपाळ गायकवाड यांच्या समाधीला पुष्पहार अर्पण करून पंडित भाऊ दाभाडे संस्थापक अध्यक्ष बहुजन जनता दल यांनी नतमस्तक होऊन अभिवादन केले,
दलित बौद्ध बहुजन मराठा यांच्यासह इतरही घटकांच्या नव्या युवा पिढीला छत्रपती संभाजी महाराज आणि वीर योद्धा गोविंदा गायकवाड यांच्या प्रकरमाची आणि त्यांच्या शौर्याची पेरणा देणारा इतिहास माहिती व्हावी यासाठी बहुजन जनता दलाच्या वतीने वीर योद्धा गोविंदा गोपाल गायकवाड यांच्या जयंती मोठ्या उत्साहाने दरवर्षी साजरी करण्यात येते.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे जन्मस्थळ (भिमभुमि) महूगाव मध्य प्रदेश आणि महापरिनिर्वाण ६ डिसेंबर चैत्यभूमी मुंबई व धम्मचक्र प्रवर्तन दिन दीक्षाभूमी नागपूर तर शौर्य दिन १ जानेवारी भीमा कोरेगाव पुणे या सर्व ठिकाणचे उत्सव मोठ्या प्रमाणात आपण साजरे करतो त्याचप्रमाणे वीर योद्धा गोपाल गोविंद गायकवाड यांची जयंती सुद्धा दलित बौद्ध बहुजन व मराठा समाजाने दरवर्षी १० अगस्ट रोजी वढू बुद्रुक तालुका शिरूर जिल्हा पुणे येथे येऊन साजरी करावी नतमस्तक व अभिवादन करावे असे आव्हान बहुजन जनता दलाचे संस्थापक अध्यक्ष पंडित भाऊ दाभाडे यांनी केले
यावेळी गोविंद गोपाळ गायकवाड यांचे १४ वे वंशज असलेले जयेश राजेंद्र गायकवाड पांडुरंग गायकवाड रमेश गायकवाड सुरेश गायकवाड संदीप गायकवाड नाना जाधव यांच्यासह अनेक बहुजन जनता दलाचे कार्यकर्ते व मान्यवर उपस्थित होते