कारंजा : "ओम् सर्वे भवन्तु सुखिनः । सर्वे भवन्तु निरामय ॥" ह्या पवित्र मंत्राप्रमाणे समाजाला मानव सेवा परमो धर्मः ही शिकवण देणाऱ्या संत श्री गजानन महाराज यांचा प्रगटदिन वारकऱ्या कडून जगभरात आनंदोत्साहात साजरा केल्या जात असतो.त्यामुळेच गेल्या पाच वर्षापासून दरवर्षी करंजमहात्म्य परिवाराच्या वतीने श्रींचा प्रगटदिन विशेषांक काढण्यात येत असतो. सदर विशेषांकामधून श्रीक्षेत्र शेगाव येथील संत गजानन महाराजांचे विविध लेख,चरित्र, आरती प्रकाशीत केल्या जात असल्याने कारंजेकर भाविकांनाही दरवर्षी सदर अंकाची प्रतिक्षा असते. त्यामुळे महाराष्ट्र शासन पुरस्कार आणि कर्मयोगी संत गाडगेबाबा स्वच्छतादूत राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त असलेले संत गजानन महाराजांचे वारकरी तथा साप्ताहिक करंजमहात्म्यचे संपादक संजय कडोळे दरवर्षी विशेषांक प्रकाशित करून त्याचे भाविकांमध्ये निःशुल्क वितरण करीत असतात.
या परंपरेप्रमाणे रविवारी 03 मार्च रोजी कारंजा शहरात संपन्न होणाऱ्या प्रगटदिना निमित्त शनिवारी पूर्वसंध्येला,कारंजा शहर पोलीस स्टेशनच्या, संत श्री गजानन महाराज मंदिरामध्ये,श्रींचे प्रमुख सेवाधारी सुरेशजी ठाकरे गुरुजी, गजाननराव कडू व उपस्थित भाविकांचे हस्ते श्रींच्या पावन पदस्पर्शाने पुनीत करून श्री संत गजानन महाराज प्रगटदिन विशेषांकाचे थाटात प्रकाशन करण्यात आले त्यानंतर कारंजा व आजूबाजूच्या इतरही शहरात व खेडोपाडी संत श्री गजानन महाराज विशेषांक पाठविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे .