आदिशक्ती महिला बहुउदशीय संस्थेच्या वतीने आव्हानात्मक आर्थिक परिस्थिती असणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता शिक्षण क्षेत्रात विविध योजना राबवल्या जात आहेत. याचाच एक भाग म्हणून सावित्रीबाई फुले पुस्तकपेढी योजनेची सुरवात बॅ. रामराव आदिक विद्यालय शेलूवाडा येथील विद्यार्थ्यांकरिता करण्यात आली.
उद्घाटनिय कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून करंजा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी श्रीकांत माने, प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापक चंद्रशेखर मालठाणे, विदर्भ विज्ञान अध्यापक मंडळाचे सचिव विजय भड, आदिशक्ती संस्थेचे हेमंत पापळे, केन्द्रप्रमुख चारथळ हे उपस्थित होते.यावेळी मान्यवरांचे हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येऊन हरापर्पण करण्यात आले.यावेळी बोलताना विजय भड यांनी आदिशक्ती महिला संस्थेच्या विविध कार्याची माहिती देऊन संस्थेने आतापर्यंत शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या कामांची माहिती दिली. शेलुवाडा येथील वर्ग 9 वी तिल विद्यार्थ्यांकरिता 25 संच व वर्ग दहावीचे विद्यार्थ्यांना 25 संच शाळेमध्ये उपलब्ध करून देण्यात आले. यावेळी वर्ग 9 व 10 वी च्या विद्यार्थ्यांना कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते पाठ्यपुस्तकाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमचे संचलन व आभार हमीद खान यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्म.यांनी अथक प्रयत्न केले.