कारंजा - येथून जवळ असलेल्या ग्राम यावर्डी येथील बाबासाहेब धाबेकर माध्यमिक विद्यालयात 22 जुलै पासून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे द्वारा शिक्षण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या शिक्षण सप्ताहाच्या अंतर्गत 25 जुलै रोजी आजी व माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन संगीत मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते.
संपूर्ण महाराष्ट्रात शिक्षण सप्ताह अंतर्गत 25 जुलै हा सांस्कृतिक दिन म्हणून साजरा केला. स्थानिक आणि पारंपरिक कलाकार यांना शाळेत बोलून त्यांची कला प्रादेशिक करण्यात यावी असे निर्देश होते. त्यानंतर बाबासाहेब धाबेकर माध्यमिक विद्यालय स्थानिक विविध कलाकारांना आमंत्रित करण्यात आले. ज्यामध्ये तबलावादक म्हणून चैतन्य स्वर्गे, हार्मोनियम वादक म्हणून श्रीकांत स्वर्गे, गायक म्हणून शुभम वाघमारे या ३ माजी विद्यार्थ्यांना तर पारंपरिक कलाकार भजनी मंडळातील संजय जमाले,दिलीप लबडे, पुरुषोत्तम जमाले यांना आमंत्रित करण्यात आले. या सर्व कलाकारांनी ओंकार स्वरूपा सद्गुरू समर्था या भक्ती गीते सुरुवात केली. त्यानंतर भावगीत, देशभक्ती गीत, स्फूर्ती गीत, भजन, गवळण अशा मेजवानी विद्यार्थ्यांना मिळाली. यासोबतच श्रीकांत स्वर्गे व चैतन्य स्वर्गे या माजी विद्यार्थ्यांनी तबला चाटी, हार्मोनियम याबाबत सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना दिली. यावेळी आजी विद्यार्थ्यांनी सुद्धा विविध गीताचे गायन करून काही गीतावर नृत्य सादर केले तसेच एक नाटिका सुद्धा सादर केली. हार्मोनियम व तबल्याची साथ माजी विद्यार्थिनी दिली. या संगीतमय वातावरणात शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षक कर्मचारी यांनी सुद्धा आपली कला सादर केली.अशाप्रकारे आजी-माजी विद्यार्थी व शिक्षकाच्या सहभागातून तब्बल तीन तास पर्यंत संगित मैफिल सुरू होती. या संपूर्ण संगीत मैत्रीचे बहारदार सूत्रसंचालन शाळेचे मुख्याध्यापक विजय भड यांनी केले. आमंत्रित केलेले सर्व माजी विद्यार्थी व पारंपारिक कलाकार यांचा शाळेतर्फे शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. संगीत मैफिलीचे प्रास्ताविक गोपाल काकड तर आभार अनिल हजारे यांनी मानले. सदर संगीत माहिती यशस्वी करण्यासाठी शाळेचे शिक्षक राजेश शेंडेकर,गोपाल काकड, अनिल हजारे, शिक्षकेतर कर्मचारी देविदास काळबांडे, भालचंद्र कवाणे, राजू लबडे, राजेंद्र उमाळे,राजेश लिंगाटे यांनी अथक प्रयत्न केले. यावेळी शाळेतील वर्ग 8 9 10 चे विद्यार्थी तसेच गावकरी मंडळी उपस्थित होते.