कारंजा (लाड) : कारंजा (लाड) येथे दि.२० एप्रिल रोजी सकाळपासून कडकडीत उन्हाने अंगाची लाही होत असतांनाच अचानक दुपारी बाराच्या आसपास ढगांचा गडगडाट ऐकायला येऊन पावसाचे काही थेंब बरसले.त्यानंतर वातावरणात बदल होऊन परत उन्ह तापायला लागले.सायंकाळी साडेतिन नंतर परत आकाशात ढग जमून, पावणेचारला काही वेळ पर्यंत चक्रीवादळ सदृश्य वावटळी निर्माण होऊन विजांचा लखलखाट नी ढगांचा गडगडाट सुरु होऊन पावसाला सुरूवात झाली.शिवाय विज वितरणची बत्ती गुल झाल्याने नागरीकांची तारांबळ उडाली तर बायपास वरील पालावर राहणाऱ्या, झोपडीत राहणार्याच्या घरावरील छप्पर सुद्धा उडून गेलीत. श्रावणाप्रमाणे हळू हळू अवेळी पाऊस धारा कमी जास्त बरसत असल्याचे दिसून येत आहे.