यंग इंजि. एज्युकेशन सोसायटी संचालित महाराष्ट्र इन्स्टिटय़ूट ऑफ पॉलिटेक्निक ब्रम्हपुरी येथे महान भारतीय अभियंता मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या याच्या प्रतिमेला आदरांजली देऊन अभियंता दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
या प्रसंगी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते प्रामुख्याने नवीन सत्रातील २०२२-२३ यावर्षी प्रवेश केलेल्या विद्यार्थ्यांचे पुष्प गुच्छ देऊन द्वितीय व तृतीय वर्षातील विद्यार्त्यांनी स्वागत केले.विद्यार्थ्यांनी अभियंता दिवसाचे महत्व आपल्या भाषणातून व्यक्त करीत मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जीवनावर भर देत पठवून दिले.
या प्रसंगी प्राचार्य सुयोग बाळबुधे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून खरा अभियंता तोच जो देशाच्या प्रगतीत आपला हातभार लावत नवीन प्रणाली निर्माण करीत जनकल्याण करणारा असतो हे सांगत नवीन विद्यार्थ्यांना पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्युत शाखेचे विभागप्रमुख यांनी केले तर आभार प्रदर्शन स्थापथ्य शाखेचे विभागप्रमुख असद शेख यांनी केले संचालन तृतीय वर्षयातील सौरभ भोपाल व शुभांगी ढोरे यांनी केले. कार्यक्रमाला प्रामुख्याने प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे संस्थापक श्री.देवेंद्रजी पिसे उपस्थित होते त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना अभियंता दिवसाच्या शुभेच्छा दिला तसेच महाराष्ट्र इन्स्टिटय़ूट ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ. सचिन दुधे,प्रा.विशाल लोखंडे,प्रा.नरेंद्र समर्थ,सर्व प्राध्यापक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते.