वाशिम:- भारताच्या गेल्या ११ वर्षाच्या अमृतकाळानिमित्त, मोदी सरकार कडून,सेवा, सुशासन व गरीब कल्याणाबाबत केलेल्या कामाची माहिती देण्यासाठी भारतीय जनता पार्टी वाशिम जिल्ह्याच्या वतीने, शुक्रवार, दि. १३ जुन रोजी दुपारी ३ वाजता स्थानिक महेश भवन येथे इंजिनिअर,डॉक्टर, सीए,उद्योजक,वकील व व्यापारी अशा विविध क्षेत्रातील व्यवसायीकांसोबत स्नेहभेट व संवाद कार्यक्रम आयोजीत करण्यात आला आहे.
यावेळी अकोला लोकसभा मतदार संघाचे युवा खा.अनुप धोत्रे,भाजपा जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम चितलांगे,आ.श्याम खोडे हे व्यवसायीकांशी संवाद साधणार आहेत.या कार्यक्रमाला कारंजाच्या लोकप्रिय आमदार श्रीमती सईताई डहाके,विधान परिषद आम.वसंतराव खंडेलवाल,विधान परिषद आम. बाबुसिंग राठोड,मा.कार्यकारी अध्यक्ष राजु पाटील राजे,माजी आम.विजय जाधव,नकुल देशमुख,सुरेश लुंगे,अशोक हेडा यांची प्रमुख उपस्थिती राहील. या कार्यक्रमाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ११ वर्षातील विकास कामाची माहिती व्यवसायीक वर्गापर्यत पोहचविण्याचा भाजपाचा मुळ उद्देश आहे.तरी जिल्हयातील सर्व व्यवसायीक,इंजिनिअर,डॉक्टर, सिए,उद्योजक,वकील व व्यापारी बंधुंनी या कार्यक्रमास बहूसंख्येने उपस्थित राहावे.असे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम चितलांगे यांनी केले आहे.
आपल्या प्रतिक्रिया द्या....