गडचिरोली :- गट प्रवर्तक महिलांना दरमहा दहा हजार रुपये मानधन वाढ, दरमहा आरोग्यवर्धिनीचे पंधराशे रुपये , कंत्राटी कर्मचाऱ्यांचे सर्व हक्क व भाऊबीज. तसेच आशा महिलांना दरमहा सात हजार रुपये मानधन वाढ व भाऊबीज देण्याचा जीआर काढल्याशिवाय 12/1/2024 पासून बेमुदत राज्यव्यापी संप सुरूच राहील असे आयटक राज्य सचिव कॉ.विनोद झोडगे यांनी 11 जानेवारी रोजी गडचिरोली जिल्हा परिषदेसमोर आयोजित आशा वर्कर व गट प्रवर्तक कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलनात जाहीर केले.
जिल्हा परिषद समोर आशा वर्कर गटप्रवर्तक महिलांनी सरकार विरोधात तीव्र नारेबाजी करत हल्लाबोल केला त्यानंतर मुख्यकार्यकारी अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या मार्फत सरकारला निवेदन देऊन 12 जानेवारी पासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा दिला.
शिष्टमंडळाच्या वतीने सांगण्यात आले की 29 डिसेंबर पासूनच सर्व ऑनलाईन कामावर सर्व आशा गटप्रवर्तक महिलांनी बहिष्कार घातलेला आहे. त्यामुळे अधिकाऱ्यानीं ऑनलाईन कामाबाबत सक्ती करता कामा नये. अन्यथा फक्त त्या विरोधातही आंदोलन करण्यात येईल.
अखिल भारतीय आशा गटप्रवर्तक आयटक राज्य सचिव कॉ.विनोद झोडगे यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील आशा व गटप्रवर्तक महिलांनी 18 ऑक्टोबर 2023 पासून बेमुदत संप केलेला होता. यासंदर्भात आठ नोव्हेंबर रोजी सन्माननीय तडजोड झाली. त्यामध्ये महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री श्री तानाजी सावंत यांनी दिलेल्या आश्वासनानुसार शासकीय आदेश अद्याप मिळालेले नाहीत. या घटनेस दोन महिने झाले आहेत. तरी अद्याप महाराष्ट्र शासन काही निर्णय घेण्यास तयार नसल्यामुळे महाराष्ट्रातील आशा व गटप्रवर्तक महिलांच्या मध्ये महाराष्ट्र शासनाच्या विरुद्ध संतोष वाढत चाललेला आहे.
महाराष्ट्रामध्ये चार डिसेंबर पासून सुरू असलेल्या अंगणवाडी महिलांच्या संपाला सुधा पूर्ण पाठिंबा देण्यात आला आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील सर्व आशा व गटप्रवर्तक महिलांनी या संपामध्ये जोरदार भागीदारी करावी असे आवाहन कॉ देवराव चवळे यांनी केले.
आंदोलनाचे नेतृत्व महाराष्ट्र आशा व गटप्रवर्तक आयटक चे विनोद झोडगे ,आयटक चे जिल्हाध्यक्ष कॉ .देवराव चवळे, जिल्ह्याच्या सचिव सरिता नैताम ,संगीता मेश्राम,माया दिवटे,संगीता मामिडवार,चंदा लोखंडे,सोनाली ठाकरे,लता नंदेश्वर , उमा समुद्रालवार,प्रज्ञा उपाध्ये यांनी केले .आंदोलनात जिल्हाभरातील हजारो आशा वर्कर गट प्रवर्तक कर्मचारी उपस्थित होत्या. 12 जानेवारी पासून बेमुदत संप व धरणे आंदोलन सुरूच राहणार असल्याची माहिती संघटनेच्या जिल्हा सचिव सरिता नैताम यांनी दिली आहे.
दिनाक :-11 जानेवारी 2024
वरील बातमी आपल्या लोकप्रिय दैनिकात प्रकाशित कराल ही विनंती.
आपला
कॉ.विनोद झोडगे राज्य सचिव आयटक गडचिरोली.
आपल्या प्रतिक्रिया द्या....