मानोरा : येथून जवळच असलेल्या ग्राम जनुना खुर्द येथे नुकताच जनुनाखुर्द येथील ग्राम पंचायत कार्यालयाच्या इमारतीचा लोकार्पण सोहळा आणि विदर्भ लोककलावंत संघटना कारंजाच्या मानोरा शाखेचे अध्यक्ष व्यसनमुक्तीसम्राट ह.भ.प.लोमेश महाराज पाटील यांना आदर्श जीवन गौरव समाजरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन भव्य दिव्य सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम जनुना खुर्द येथे संपन्न झाला . या कार्यक्रमाचे सविस्तर वृत्त असे की, कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघाचे आमदार राजेंद्र पाटणी यांच्या विकास निधीमधून निर्माणाधिन ग्रामपंचायत इमारतीचे लोकार्पण मानोरा तालुका भाजपा अध्यक्ष ठाकुरसिह चव्हाण यांचे अध्यक्षतेखाली, आमदार राजेंद्र पाटणी यांचे हस्ते , कार्यक्रमाचे सर्व प्रमुख अतिथी -जि प सदस्य तथा गटनेते संचालक दि अकोला जिल्हा मध्यवर्ती बॅक मानोराचे उमेश पाटील ठाकरे, जि प सदस्य अजय जयस्वाल, भाजपा ज्येष्ठ नेते महादेव ठाकरे, पं. स . मानोरा सदस्प प्रविण चोहे, पं. स . मानोरा सदस्य सचिन घोडे, पं.स माजी उपसभापती बशीरभाई, पं स सदस्य देवानंद होलगरे, रवि दिघडे, गजानन भवाने, अरविंद राठोड, आशिष राठोड, गोपाल चोहे, नरेंद्र राऊत, विजय चव्हाण, आमिर भाऊ, वसंतराव ठाकरे, संदिप ठाकरे, वसंत पवार, ग्रामपंचायत जनुना खुर्दचे सचिव दिघोडे, रामधन राठोड, ग्रामपंचायत सर्व सदस्य रामहरी लावरे, सौ सुषमा रणमले, सौ ललिता राठोड, सौ द्वारका पवार, निलेश ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्व गावकरी नागरीकांच्या साक्षीने ग्रामपंचायत लोकार्पण संपन्न झाले. सर्वप्रथम ग्रामपंचायत जनुना खुर्द व गावकरी मंडळीच्या वतीने लोकप्रिय आमदार राजेंद्र पाटणी तथा जि . प . उमेश पाटील ठाकरे सदस्य , कार्यक्रमाचे अध्यक्ष ठाकुरसिह चव्हाण व प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले .आपल्या प्रास्तविक भाषणातून बोलतांना उमेश पाटील ठाकरे यांनी जनुना खुर्द गावविकासाकरीता वाढीव निधी मिळावा . येथील रस्ते व सभागृहाचे बांधकाम त्वरीत व्हावे . मंदिराचे काम व्हावे तसेच धामणगाव देव रस्त्या करीता विकास निधीची मागणी आमदार राजेंद्र पाटणी यांचेकडे लावून धरली . यावेळी आपल्या संभाषणातून बोलतांना आमदार राजेंद्र पाटणी यांनी जनुना खुर्द येथे 30 लक्ष रुपयाचे डोमशेड मंजूर केले, जनुना खुर्द ते धामणगाव देव रस्त्याला मंजूरात दिली . मुंगसाजी मंदिराचा स्लॅब मंजूर करीत नाविन सभागृहाला मंजूरात दिली . याप्रसंगी विदर्भ लोककलावंत संघटना कारंजा शाखा मानोराचे अध्यक्ष हभप लोमेश चौधरी यांनी १ ) वृद्ध कलावंताना दरमहा सरासरी पाच हजार रुपये मानधन मंजूर व्हावे . 2 ) वृद्धकलावंताची घरकुलाची मागणी मंजूर करावी . ३) वृद्ध कलावंताना महामंडळाच्या बसमध्ये प्रवास सवलत मिळावी याकरीता हिवाळी अधिवेशनात प्रस्ताव मंजूर करण्याचे निवेदन सुद्धा दिले . सदरहु कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कांचन पाटील चौधरी यांनी, प्रास्ताविक भाषण जिपचे लोकप्रिय सदस्य उमेश पाटील ठाकरे यांनी तर आभार प्रदर्शन व्यसनमुक्ती सम्राट हभप लोमेश चौधरी यांनी केले. आमदार राजेद्र पाटणी यांच्या उत्कृष्ट विकास कार्यामुळे आमच्या गावाचा नावलौकीक संपूर्ण जिल्हयात होत असल्याचे यावेळी हभप लोमेश चौधरी यांनी सांगीतले