दत्त मंदिर आरमोरी च्या प्रांगणात नुकताच बावणे कुणबी समाजाच्या महिलांचा हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न झाला सदर हळदी कुंकू कार्यक्रमात विविध स्पर्धा घेऊन साजरा करण्यात आला उद्घाटक स्थानी लताताई डोकरे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी तुळसाबाई बोरकर होते तर प्रमुख अतिथी स्थानी कमळाबाई भोयर वानिताताई टिचकुले सिंधुताई मने आदी उपस्थित होते .
पांहुण्याचे स्वागत स्वागत गीतने करण्यात आले सौ.लक्ष्मीताई मने यांनी अप्रतिम स्वागत गीत सादर केले. हळदी कुंकू कार्यक्रमाचे निमित्ताने विविध स्पर्धा घेण्यात आल्या .स स्पर्धेच्या आयोजन प्रीती भोयर आणि वर्षा तिजारे यांनी केले चना स्ट्रा स्पर्धेमध्ये मध्ये प्रथम क्रमांक स्वना मने यांनी पाठविला तर द्वितीय क्रमांक शारदा गरफडे तर तृतीय क्रमांक तृतीय नीलिमा वनवे यांनी पटकविला तर स्ट्राक केसात खोचणे या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक वंदना टीचकुले, द्वितीय क्रमांक माधवी बोरकर तृतीय क्रमांक रीना मने यांनी पटकावला कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संध्या टिचकुले गीता सेलोकर अर्चना गोंधळे सविता सेलोकर वैशाली तितीरमारे स्वाती पोटफोळे माधवी बोरकर धरती बोरकर नंदा गोंधळे प्रभाग गोंधळे शालु बोरकर इंदुताई मने माधुरी सेलोकर,सुनंदा मने सुनीता मने आशा टिचकुले उज्वला बोरकर इंदुताई वनवे बोरकर वैशाली गोधोळे,साधना भोयर,पल्लवी मने सुरेखा गोंधोळे आदींनी विशेष सहकार्य केले सदर हळदी कुंकू कार्यक्रमास महिलांनी उत्स्फूर्तपणे एकल व समूह सुद्धा सादर केले.
कार्यक्रमाचे संचालन पिंकी मने प्रास्ताविक मेघा मने यांनी केले तर आभार प्रदर्शन रत्ना बोरकर यांनी मानले..