मुंबई (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे) : आदिवासी आश्रमशाळा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मागण्या शासनाकडून वेळोवेळी प्रलंबित ठेवण्यात येत असल्याने,झोपेचे सोंग घेऊन असलेल्या राज्य शासनाला जागे करण्याकरीता, राज्यातील आदिवासी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी धरणे आंदोलनाचे हत्यार उपसून, मुंबई येथील आझाद मैदान येथे, बुधवारी दि.23 ऑगष्ट रोजी एकदिवसीय धरणे आंदोलन केले.
या धरणे आंदोलनाला, अमरावती विधान परिषदेचे सदस्य असलेल्या,शिक्षक आमदार अँड किरणराव सरनाईक यांनी स्वतः जातीने उपस्थित राहून,आपला सक्रिय पाठिंबा जाहीर करीत, राज्यशासनाने वेळ न दवडता आदिवासी आश्रमशाळेच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या रास्त मागण्या सोडवून निकाली काढण्याची मागणी केली असून,लवकरच या संदर्भात मुख्यमंत्री व मंत्रीमंडळासोबत चर्चा करणार असल्याचे सांगीतले असे वृत्त आमचे मुंबई येथील प्रतिनिधी यांनी महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष संजय कडोळे यांना कळवीले आहे.