कारंजा (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे)-शासनाच्या विविध योजनांची माहिती आणि त्या कार्यान्वित करण्यासाठी शासनाने शासनातील मुख्य अधिकारी आणि कर्मचारी जनतेच्या घरी जाऊन जनतेला आपल्या समस्या सांगता याव्यात आणि जनतेच्या समस्या जागेवर सोडता याव्यात या उद्देशाने शासन आपल्या दारी अशी महत्व पूर्ण योजना कार्यान्वित करून तालुक्यातील जवळपास सर्व विभागाच्या कर्मचाऱ्यांना एकाच छतखाली आणून तक्रारीचा निपटारा करण्याच्या सूचना केल्या आहेत.
तालुक्यातील ग्राम यावार्डी येथे 12 जून रोजी संबंधित विभागाचे कर्म. एकत्र येऊन शासन आपल्या दारी या योजनेच्या जनजागृतीची सुरवात करन्यात आली.
ग्रामपंचायत कार्यालयात सर्व कर्मचारी व गावातील लोकप्रतिनिधि एकत्र आले.तेथून गावातील बहुतांश लोकांच्या घरी जाऊन शासन आपल्या दारी अंर्तगत येत असलेल्या योजनेबद्दल माहिती दिली आणि ज्या समस्या आहेत त्याबद्दल अर्ज सादर करण्याचे आवाहन केले.
यावेळी सरपंच विद्याताई आमले,सचिव पी.पी ढवक, तलाठी मेहरे,कृषिसहायक गजनन राऊत, प.समिती सदस्य शुभम बोनके,जि.प शाळेचे मुख्याध्यापक हनुमंते, शिक्षक संजय जमाले, अल्का घुले, बाबासाहेब धाबेकर विद्यालयाचे मुख्याध्यापक
विजय भड, शिक्षक गोपाल काकड,राजेश शेंडकर,अनिल हजारे,शिक्षकेत्तर कर्म. देविदास काळबांडे, राजेश लबडे,राजेंद्र उमाळे,राजेश लिंगाटे, भालचंद्र कवाने, अंगणवाडी सेविका सुषमा आमले,अंगणवाडी मदतनीस सोनल आडोळे,आशा सेविका उज्वला कडु,आशा सेविका शिला इंगोले,crp महिला बचतगट सुवर्णा वकटे, कृषीताई राधा लबडे,कोतवाल गजनन चव्हाण,ग्राम पंचायत सदस्य तुफान बोनके,परमेश्वर आमले,ग्राम पंचायत कर्म. विवेक पोहेकर,ऑपरेटर प्रशांत ठाकरे इत्यादी उपस्थित होते. असे वृत्त मुख्याध्यापक विजय भड यांनी करंजमहात्म्य परिवाराकडे कळविल्याचे संजय कडोळे यांनी सांगीतले.
आपल्या प्रतिक्रिया द्या....