वाशिम : राज्यसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमिवर, महाराष्ट्रातील शिवसेनेते बंडखोरी होऊन जवळ जवळ सर्वच जिल्ह्यातील आमदार, बंडखोर शिंदे गटाच्या सोबत गेलेले असतांना, वाशिम जिल्ह्यातील शिवसैनिक मात्र एकसंघपणे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबतच ठामपणे उभा राहीला आहे. त्यानंतर राष्ट्रपती निवडणुकीच्या निमित्ताने, जिल्ह्यातील महिला खासदार भावनाताई गवळी यांनी सुद्धा शिवसेनेला, जय महाराष्ट्र करीत शिंदे गटाची वाट धरली. परंतु तरी देखील वाशिम जिल्हयातील ज्येष्ठाची शिवसेना, युवासेना आणि युवतीसेना शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या प्रती १००% विश्वास ठेवीत शिवसेनेच्या नेतृत्वातच पुढील राजकिय वाटचाल करण्याच्या तयारीत आहे. याबाबत अधिक वृत्त असे की, यंदा कारंजा तालुका तथा शहर शिवसेनेने, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त, शिवसेना शहर प्रमुख गणेशराव बाबरे यांच्या सक्षम नेतृत्वात शेकडो शिवसैनिकांचे, शंभर रुपयाच्या प्रतिज्ञापत्रावर, "आमचा आमचे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर १००% विश्वास असून आम्ही त्यांचे सोबत असून भविष्यातही त्यांचे सोबतच राहू" अशा आशयाचे शपथपत्र तयार केलेले असून यावेळी पक्षकार्यालयात गणेशराव बाबरे, दत्ता पाटील तुरक, विलास पाटील सुरडकर, अतुल दरेकर, अजय मदनकार, दिपक उगले, रवि घाटे, प्रविण भुजाडे, सचिन भुजाडे, रविन्द्र मोहकर, मनिष कंटाळे, लखन ठाकुर, हिम्मत मोहकर, अभिजीत मांडवगडे, रवी साटोटे इ उपस्थित होते. याप्रसंगी , "कोरोना अर्थसहाय्य जिल्हा वृद्ध साहित्यीक लोककलावंत निवड समितीचे अशासकिय सदस्य" संजय कडोळे यांचा वाढदिवसानिमित्त भव्य सत्कार करण्यात आला. नंतर गुरुवार दि. 4 ऑगष्ट 2022 रोजी, शिवसेना पक्षप्रमुख उध्दवजी ठाकरे यांच्या प्रत्यक्ष भेटीकरीता व त्यांना वाढदिवसानिमित्त शपथपत्र भेट म्हणून देण्याकरीता गणेशराव बाबरे यांच्या नेतृत्वात कारंजातील शिवसेना पदाधिकाऱ्यासह अनेक शिवसैनिक मातोश्रीवर जाण्याकरिता मुंबईकडे रवाना झाल्याचे वृत्त, महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामिण पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष संजय कडोळे यांनी कळविले आहे .