कारंजा : येथील सन्मती ज्ञानमंदिर इंग्लिश स्कूल येथे दि.12 आगस्ट रोजी मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा टप्पा दुसरा अंतर्गत परसबाग निर्मिती व वृक्ष संवर्धन याबाबत तज्ञाद्वारे मार्गदर्शनाचा कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमात परसबाग निर्मिती बाबत सखोल असे मार्गदर्शन कारंजा तालुका कृषी अधिकारी रवींद्र जटाळे यांनी केले.यावेळी त्यांनी परसबाग निर्मिती ते संवर्धन तसेच शेंद्रिय खत निर्मिती याबाबत मोलाचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले.यावेळी त्यांच्याहस्ते परसबागेत लावण्यासाठी भाजीपाला वर्गीय बियाण्याचे वाटप विद्यार्थ्यांना करण्यात आले.तसेच वृक्ष संवर्धन या विषयावर वसुंधरा फाउंडेशन कारंजा लाड च्या अध्यक्षा सौ नीता लांडे व उपाध्येक्षा सौ रेणुका राऊत। यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.यावेळी वसुंधरा फाउंडेशन कारंजा लाड यांच्याकडून वृक्ष लागवडीसाठी आवश्यक साहित्याचे वाटप विद्यार्थ्यांना करण्यात आले.यावेळी मंचकवर शाळेचे संचालक अमोद चवरे मुख्याध्यापिका सोनाली जळंबे अश्विनी गायकवाड यांची उपस्थिती होती.कार्यक्रममाची सुरुवात नमन अमोद चवरे यांच्या हस्ते प्रमुख मार्गदर्शक यांची भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलंय बोन्ते यांनी केले तर प्रस्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका सोनाली जळंबे यांनी केले तसेच आभार प्रदर्शन विठ्ठल ठाकरे यानीं केले.