घुग्घूस (चंद्रपूर) : पैश्याचा देणघेणीवरून सूरू झालेल्या वादात क्रूर घटना घडली. एका तरूणाचा पाठीवर भला मोठा दगड बांधून त्याला विहीरीत फेकण्यात आले. यात त्या तरूणाचा दूदैवी मृत्यू झाला.
प्रविण घिवे असे मृतकाचे नाव आहे. ही घटना मंगळवारला मध्यरात्री घडली. आज ( गुरूवार ) मृतदेह बाहेर काढण्यात आला. या घटनेने चंद्रपूर जिल्हा हादरला आहे. दरम्यान एका अल्पवयीन मुलासह दोन आरोपींना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.
प्राप्त माहीतीनुसार, पैश्यावरून सुरू झालेला वाद जीवावर बेतल्याची घटना आज चंद्रपुरातील मोरवा गावात घडली. मोरवा गावात राहणाऱ्या प्रवीण घिवे या युवकासोबत गावातील काही युवकांनी पैश्यावरून वाद घातला. त्यानंतर सदर वादाचे रूपांतर मारहाणीत झाले. युवकांनी मिळून प्रवीणला मारहाण केली. मात्र ते युवक इथंवर थांबले नाही. त्यांनी प्रवीणच्या पाठीला दगड बांधत त्याला विहिरीत फेकून दिले. या घटनेत प्रविनचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पडोली पोलीस घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी मृतदेह विहिरीबाहेर काढत पंचनामा केला. पडोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांनी तपासाची चक्रे फिरवली असता या खून प्रकरणीत एका अल्पवयीन मुलासह दोन आरोपींना पोलीसांनी ताब्यात घेतले. मृतक प्रवीण यांचेकडून मारेकरी युवकांनी काही पैसे उसने घेतले होते. ते पैसे परत मागायला गेलेल्या प्रवीणचा त्या मारेकऱ्यांनी काटा काढल्याचे बोलले जात आहे. इतर आरोपींचा या प्रकरणी शोध सुरू आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे.