कारंजा : कारंजा (लाड) येथील ज्येष्ठ काँग्रेस कार्यकर्ते तथा खेर्डा (जिरापुरे) ग्रामपंचायतचे माजी सरपंच प्रदिपभाऊ वानखडे यांचे वडील - वाई येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक स्व विनायकराव पांडूरंगजी वानखडे गुरुजी यांचे आज शनिवार दि.२३ जुलै२०२२ रोजी वृद्धापकाळाने वयाच्या ९१ व्या वर्षी दुःखद निधन झाले . त्यांच्या मागे त्यांच्या परिवारात वयोवृध्द पत्नी, तिन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा बराच मोठा परिवार आहे . त्यांची अंत्ययात्रा उद्या, रविवार दि.२४/०७/२०२२ रोजी सकाळी १०:३० वाजता,त्यांच्या राहत्या घरापासून, प्रियदर्शिनी कॉलेनी, प्राथमिक शाळेजवळून, (हॉटेल गुरुकृपा मागे ) बायपास कारंजा येथून ( त्यांची अंत्ययात्रा ) निघणार असल्याची माहिती मिळाली आहे. स्व . विनायकराव पांडूरंगजी वानखडे गुरुजी यांच्या निधनाची वार्ता ऐकताच शिक्षक आमदार एड किरणराव सरनाईक, आमदार अमित झनक, माजी सभापती जयकिसन राठोड, ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे, रामबकस डेडूळे, ब्र .कु . मालती दिदी,,ब्रम्हकुमारी विश्व विद्यालय कारंजा,महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामीण पत्रकार परिषद वाशिम, विदर्भ लोककलावंत संघटना कारंजा, प्रदिप वानखडे मित्र मंडळ, इ नी आपल्या शोकभावना कळविल्या असून भावपूर्ण श्रध्दांजली व्यक्त केली असून आम्ही वानखडे परिवाराचे दुःखात सहभागी असल्याचे म्हटले आहे .