जाफराबाद:- जाफराबाद तालुक्यातील टेंभूर्णी येथे विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ प्रमुख प्रविण भाई तोगडिया यांच्या जन्मदिनानिमित्त स्थानिक बजरंग दल व जनकल्याण रक्तपेढी जालना यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी टेंभूर्णी येथिल संत सावता मंगल कार्यालयात रक्तदान शिबिर घेण्यात आले..
यावेळी 51 रक्तदात्यांनी रक्तदान केले या शिबिरात तरुण उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.
या शिबिरात नितीन शिंदे, बालाजी डोमाळे, विष्णु ढवळे, अभिजित बारगुडे, राजेश धनवई, किरण मंडलकर, अमोल सोनसाळे, रोहन इंगळे, सुदर्शन जमदडे, हरिभाऊ क्षीरसागर, रघुनाथ इंगळे, सुनील भिसे, गणेश फुले, अनिकेत उखर्डे, पवन उखर्डे, अनिकेत जमदडे, रुपेश सनांसे, प्रीतम डोमाळे, प्रदिप काबरा यांच्यासह आदींनी रक्तदान केले.
आपल्या प्रतिक्रिया द्या....