कारंजा (लाड) : राज्यशासन मोठा गाजावाजा करून ग्रामिण विभागाकरीता लाभाच्या योजना सुरु करतांना दिसते.मात्र प्रत्यक्षात त्याची अंमल बजावणी मात्र होतांना दिसत नाही. आरोग्य,ग्रामविकास,महिला बालकल्याण मंत्रालयामार्फत सध्या बेटी बचाओ बेटी पढाओ,लेक लाडकी,सुकन्या योजना इत्यादी योजनेतर्गत तसेच गरोदर महिला, एका अपत्यावर किंवा मुलीच्या जन्मानंतर शस्त्रक्रिया करणाऱ्या महिलांकरीता शासनाने प्रधानमंत्री मातृवंदना यांजनेंतर्गत प्रोत्साहन निधी देण्याचे जाहिर केले होते मात्र आरोग्य उपकेन्द्र शहा मार्फत लाभाच्या योजनांची प्रोत्साहन पर रक्कम अद्यापही लाभार्थ्यांच्या खात्यात न आल्याने, या प्रकरणी जिल्हाधिकारी तथा मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी लक्ष्य घालून लाभार्थ्यांना देय असलेली रक्कम देण्याची मागणी कारंजा तालुक्यातील आरोग्य उपकेन्द्र शहा येथील नागरिकांनी केली आहे.