(जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे) जिल्हा जातीय व राजकीय दृष्टया संवेदनशील असून नजीकच्या काळात समाज माध्यमांद्वारे आक्षेपार्ह संदेश प्रसारीत झाल्याने पोस्टे.कारंजा शहर,अनसिंग, जऊळका,मालेगाव,शिरपूर, रिसोड व धनज येथे वेगवेगळया कारणांवरुन जातीय तणाव निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता.
आगामी सण-उत्सव काळात एखाद्या व्यक्तीकडून समाज माध्यमांद्वारे आक्षेपार्ह संदेश/व्हिडीओ प्रसारीत झाल्यास हिंसक घटना घडून कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.सामाजिक माध्यमाद्वारे आक्षेपार्ह संदेश/पोस्ट/ व्हिडीओ
प्रसारीत करणे हे कृत्य भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 505, 153A,116 नुसार दंडनिय अपराध आहे.
जिल्हयात अनुचित प्रकार घडू नये तसेच समाज माध्यमाद्वारे आक्षेपार्ह संदेश/पोस्ट/व्हिडीओ प्रसारीत होण्यास अटकाव निर्माण व्हावा.याकरीता 22 जूनपर्यंत जिल्हादंडाधिकारी षन्मुगराजन एस.यांनी प्रतिबंधात्मक आदेश लागू केले असून आक्षेपार्ह संदेशावर संबधित कार्यालयाकडून करडी नजर राहणार आहे.असे वृत्त महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेला जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्राप्त झाले आहे.