कारंजा : वाशिम जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक मा. बच्चनसिह यांचे प्रशासकिय स्थानांतर झाल्यामुळे कारंजा शहर पोलीस स्टेशन येथे पोलिस विभागाकडून त्यांना निरोप देण्यात आला. यावेळी कार्यक्रमाला सत्कारमूर्ती पोलीस अधिक्षक बच्चनसिह, स्थानिक उपविभागीय पोलिस अधिकारी जगदिश पांडे, कारंजा शहर पोलीस स्टेशनला कर्तव्यावर असलेले पोलिस निरीक्षक, दिनेश चंद्र शुक्ला,कारंजा ग्रामीण पोस्टेचे पोलीस निरिक्षक वानखडे,सर्व पोलीस उपनिरिक्षक,सहाय्यक पोलीस निरिक्षक, दंगा पथकाचे जवान, पोलीस कर्मचारी इत्यादी उपस्थित होते.यावेळी कारंजाचे माजी नगराध्यक्ष संजय काकडे, सामाजिक कार्यकर्ते तथा नपचे माजी उपाध्यक्ष बिसूभाई पहेलवान, महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष तथा साप्ताहिक करंजमहात्म्य परिवाराचे महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त संपादक संजय कडोळे,वैदर्भिय नाथ समाज संघाचे संस्थापक अध्यक्ष एकनाथ पवार, साप्ता.करंजमहात्म्यचे सहसंपादक उमेश अनासाने, श्री गुरुमंदिर रुग्नवाहिकेचे रमेश वानखडे इत्यादी उपस्थित होते. उपस्थित पत्रकार संजय कडोळे, एकनाथ पवार यांनी बच्चनसिहजी यांचे नेहमीच कारंजेकर नागरिकांना सहकार्य मिळाल्याचे आवर्जून सांगताना त्यांच्या कारकिर्दीत शांतता व सलोखा कायम राहील्याचे स्पष्ट केले त्यामुळे त्यांचा कार्यकाल संस्मरणिय राहीला असल्याचे सांगीतले.यावेळी उपविभागीय अधिकारी जगदिश पांडे, पोलीस निरिक्षक दिनेशचंद्र शुक्ला यांनी पुष्पगुच्छ देऊन जिल्हा पोलीस अधिक्षक बच्चनसिह यांचा सत्कार केला. पोलीस अधिक्षकांनी आपल्या सर्वच सहकारी पोलीस कर्मचाऱ्याचे सहकार्य मिळाल्याचे स्पष्ट करतांना "कर्तव्यावर असतांना, वाशिम जिल्हावासियानी आणि कारंजेकरांनी दिलेला स्नेह आणि ही माझ्या पुढील वाटचाली करीता भविष्याची शिदोरी ठरणार असल्याचे सांगीतले.