वाशिम : वाशिम जिल्ह्यातील हवामान अभ्यासक श्री.गोपाल भाऊ गावंडे यांच्या अंदाजाप्रमाणे गुरुवारी दि 15 फेब्रुवारी रोजी दुपारी अचानकपणे,वाशिम शहरात धो धो पाऊस बरसला. त्यामुळे हिंगोली रोडवरील कृषी बाजार समितीमध्ये विक्रीकरीता आणलेल्या शेतकऱ्याच्या शेतमालाला धान्य बाजारात त्याचा फटका बसला असून, अचानक बरसलेल्या पावसाने बाजारात आलेल्या शेतकरी व्यापाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाल्याचे दिसून आले.चालू आठवड्यात दि.10 ते 15 फेब्रुवारी 2024 पर्यंत पाऊस होण्याचा अंदाज 16 डिसेंबर रोजीच श्री गोपाल भाऊ गावंडे यांनी वर्तवीला होता. आणि त्यानुसार ते वेळोवेळी शेतकरी व ग्रामस्थांना सतर्क करीत होते. त्यांच्या अंदाजानुसार दि 10 व 11 फेब्रुवारी रोजी पूर्व विदर्भातील देवळी,वर्धा, हिंगणघाट,चंद्रपूर,भंडारा सोबतच अमरावती, यवतमाळ जिल्हयातही गारपिटीसह चांगलाच पाऊस झाला होता. शिवाय मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यात विजा कोसळून जीवीतहानी सुद्धा झाली होती.आणि गुरुवारी वाशिम शहरात धो धो पाऊस कोसळला. त्यामुळे शेतकऱ्याच्या शेतमालाचे पावसाने भिजल्यामुळे चांगलेच नुकसान झाल्याचे वृत्त आमच्या प्रतिनिधी कडून महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष संजय कडोळे यांना कळविण्यात आले आहे. या संदर्भात गोपाल भाऊ यांचेशी भ्रमणध्वनि वरून संवाद साधला असता त्यांनी सांगितले, "नैसर्गिक पर्यावरणा मधील हवेच्या बदलामुळे पावसाळी स्थिती निर्माण होत असते." गोपाल भाऊ गावंडे यांच्या अचूक अंदाजा बद्दल हवामान अभ्यासक असलेल्या गोपालभाऊ गावंडे यांच्या अंदाजाला "मानलं पाहिजे राव ! " अशा शब्दात ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे यांनी गोपालभाऊ गावंडे यांचे कौतुक करीत जिल्हाधिकारी वाशिम आणि जिल्हा प्रशासनाने त्यांच्या अचूक अंदाजा बद्दल त्यांना पुरस्कारित केले पाहिजे असे म्हटले आहे.