ब्रम्हपुरी पोलिस विभागानी जप्ती केलेला दारूसाठा नाश करण्यात आला.
सविस्तर माहिती असे की, ब्रम्हपुरी पोलिस स्टेशन येथे दारूबंदी सदराखाली दाखल 395 गुन्हातील दारू चा नाश ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर येथे सन 2020 ते 2021 वर्षातील महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये दाखल 395 गुन्ह्यातील 58,00,000 /- रुपये दारूचा दिनांक :- 9/4/2022 रोजी करण्यात आला.
सदर कारवाई मा. मिलिंद शिंदे तालुका उपविभागीय पोलिस अधिकारी उपविभाग ब्रह्मपुरी यांचे मार्गदर्शनाखाली तसेच पोलिस निरीक्षक रोशन यादव व उत्पादक शुल्क विभागाच्या विभाग अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
पोलिस स्टेशन ब्रम्हापुरी हद्दीतील शहरी व ग्रामीण भागात पोलिस अधिकारी व अंमलदारानी सन 2020 ते 2021 वर्षात विविध अवैध दारू विक्रेत्यावर धडक कारवाई करून दारु चा माल जप्त केलेला होता.सदर माल नाश करण्याच्या अनुषंगाने मा. कोर्टाकडून परवानगी घेऊन सदर कारवाई करण्यात आली.