बल्लारपूर बामणी ते राजुरा मार्गावर कारने ऑटोला जोरदार धडक दिल्याने ऑटोतील सहाजण गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी रात्री ८. ३० च्या सुमारास घडली. सर्व जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
ऑटो चालक दीक्षित हेगडे हा ऑटो (एमएच ३४ डी ५८३२ ) तून सहा प्रवाशांना घेऊन ओम साई सभागृह राजुरा येथे जात होता.
दरम्यान, बामणी ते राजुरा मार्गावर पेट्रोल पंपसमोर राजुराकडून येणाऱ्या ऑटोला धडक दिलेली हीच ती कार.
एमएच ३४ एएम ८०७५ क्रमाकांच्या भरधाव कारने ऑटोला जोरदार धडक दिली. यामध्ये ऑटो चालक दीक्षित येगडे, वनिता भोयर, शगुना पोरटेट,वर्षा इंगळे, अर्चना पारबांधे व कमला (रा. बामणी) हे गंभीर जखमी झाले. त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातानंतर कारचालक घटनास्थळावरून फरार झाला.
बामणी येथील कार्तिक कोरले यांच्या तक्रारीवरून कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला. ठाणेदार उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक गिन्नलवार तपास करीत