कारंजा [लाड] : श्री महालक्ष्मी ज्येष्ठा कनिष्ठा गौराई पूजन आणि त्यानिमित्त महाप्रसादाकरीता, मातृशक्तिउपासकांकडून आपआपल्या आप्तेष्ठ आणि मित्रमंडळी यांना देवदर्शन आणि स्नेहभोजनाला बोलविण्याची प्राचिन रूढी किंवा परंपरा आहे. सर्व कार्यक्रमा पेक्षा श्री महालक्ष्मी कार्यक्रम आणि महाप्रसादाचे व्रत आणी नियम फारच कठीण असतात आणि ज्यांच्या घरी हे गौरी पूजन असते . त्यांचेकडे प्रत्यक्ष नारीशक्ती स्वरूपात, पाहुण्या आल्याचा आभास होत असतो व तशी रेचचेल सुद्धा असते . कारंजा शहरातील जे डी चवरे विद्या मंदिर कारंजा या विद्यालयाचे दोन विद्यार्थी अनिल भेलांडे आणि संजय कडोळे हे चाळीस वर्षापूर्वी एकत्र शिक्षण घेत होते पुढे संजय कडोळे यांनी समाज सेवेचे व्रत घेऊन आपला मार्ग निवडला तर अनिल भेलांडे यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये नोकरी पत्करली . दोघांच्या वाटा भिन्न असल्यामुळे, एका गावात राहूनही भेटीगाठी पासुन दोघेही दुरावले परंतु दि. ५ सप्टेंबर रोजी अचानक विदर्भ लोककलावंत संघटनेचे उपाध्यक्ष नंदकिशोर कव्हळ्कर यांच्या माध्यमातून गौराई दर्शना निमित्ताने भेटीचा योग आणला आणि दोघांची प्रत्यक्ष भेट झाली . दोघांनीही मनमुराद गप्पा करीत, काय ती शाळा . . . ! काय तेव्हाचे शिक्षक . . . !! आठवततात ते दिवस . . . !!! असे म्हणत असतांना जुन्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी नंदकिशोर कव्हळकर, ललित रोडे, मनोज गाढवे, संजय कडोळे, अनिल भेलांडे यांनी स्नेहभोजनाचा परमानंद लुटला.