अकोला: स्थानिक दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला चे संस्थापक अध्यक्ष , मतदार साक्षरता अभियान जिल्हा अकोला चे ब्रँड अँबेसिडर व शिवाजी महाविद्यालय अकोला चे सहाय्यक प्राध्यापक डॉ.विशाल कोरडे यांच्या मार्गदर्शनात *दि.८ एप्रिल २०२४ रोजी रेल्वे स्टेशन परिसरात मतदार साक्षरता अभियान राबविण्यात आले . रेल्वे स्टेशन कार्यालयातील कर्मचारी , परिसरातील दुकानदार , व्यावसायिक , हमाल , ऑटो चालक व प्रवाशांशी मतदार साक्षरता अभियान जिल्हा अकोला चे ब्रँड अँबेसिडर डॉ.विशाल कोरडे व दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला च्या सर्व सदस्यांनी संवाद साधून मतदान करणे का आवश्यक आहे ? याविषयी जनजागृती केली.प्रत्येक प्लॅटफॉर्मवर जाऊन प्रवाशांशी संवाद साधला. विशेषतः दिव्यांग मतदार, नवमतदार व महिला मतदारांशी चर्चा केली* . दिव्यांग मतदारांना ब्रेल लिपी , मदतनीस व व्हीलचेअर च्या माध्यमाने मतदान केंद्रावर आपले मतदान करता येईल याविषयी डॉ.कोरडे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले . सर्व प्लॅटफॉर्मवर जाऊन प्रत्येकाशी संवाद साधून मतदार साक्षरता अभियान राबवण्याचे राष्ट्रीय कार्य दिव्यांग सोशल फाउंडेशन द्वारा करण्यात आले . यावेळी रेल्वे स्थानक परिसरात मी मतदान करणार आम्ही मतदान करणार अशा घोषणा सर्वांचे लक्ष वेधित होत्या . दि.26 एप्रिल २०२४ पर्यंत डॉ विशाल कोरडे व दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला संपूर्ण अकोला जिल्ह्यात मतदार साक्षरता अभियान राबवणार आहे . विशेषतः दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचविणे व त्यांना मदतनीस उपलब्ध करून देण्यासाठी दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोलाच्या ९४२३६५००९० या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा* असे आव्हान अग्रणी दूत डॉ.विशाल कोरडे यांनी केले आहे . मतदार साक्षरता अभियानाच्या या सामाजिक व राष्ट्रीय उपक्रमात दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला तर्फे अस्मिता मिश्रा , अनामिका देशपांडे , सिद्धार्थ ओवे , गणेश सोळंके , विजयकुमार वणवे,सुजाता आसोलकर , संजय फोकमारे व विजय कोरडे यांनी सहकार्य केले .