काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या विरोधात कट कारस्थान रचत केंद्रातील मोदी शासनाने सख्त वसुली संचालनालय (ईडी) तर्फे नोटीस पाठविण्यात आले.
आज राहुल गांधी यांना चौकशी साठी ईडी कार्यालयात बोलवण्यात आले. या निषेधार्थ संतप्त काँग्रेस नेत्या तर्फे नागपूर येथील ईडी कार्यलयाला घेराव घालण्यात आला. यावेळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
याप्रसंगी पोलिसांनी बहुजन विकास मंत्री तथा चंद्रपूर पालकमंत्री विजय वड्डेटीवार, ऊर्जामंत्री नितीन राऊत, आमदार अभीजित वंजारी, आमदार राजू पारवे, जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, ग्रामीण महिला जिल्हाध्यक्ष नम्रता ठेमस्कर, काँग्रेस अध्यक्ष राजूरेड्डी , कामगार नेते सैय्यद अनवर, रोशन दंतलवार, इर्शाद कुरेशी, सुकुमार गुंडेटी, अनुप भंडारी,रोहित डाकुर, रफिक शेख, शाहरुख शेख यांच्या सह शेकडो कार्यकर्त्यांना अटक कारवाई करून गिट्टी खदान येथील पोलिस मुख्यालयात नेण्यात आले.