कारंजा शहरातील अखिल भारतिय नाट्य परिषदेच्या स्थापनेपूर्वी पासूनच कारंजा नगरी ही कलानगरी म्हणून ओळखली जाते.कारंजा नगरीत पूर्वी ज्येष्ठ लोक कलावंत शिवमंगलआप्पा राऊत हे नटश्रेष्ठ म्हणून ओळखले जायचे त्यांचे वडील स्व.फकिरआप्पा राऊत सुद्धा आयुष्यभर कलाकार म्हणूनच जीवन जगले.नाट्य परिषदेच्या कारंजा येथिल शाखेच्या स्थापनेपूर्वीच कारंजा येथे जय बजरंग व्यायाम मंडळ,महाराणा प्रताप व्यायाम शाळा,लोकमान्य व्यायाम शाळा, महात्मा फुले व्यायाम शाळा अस्तित्वात होत्या आणि त्याद्वारे, श्रीरामनवमी मध्ये,रंगमंचावर रामलिला,नवदुर्गोत्सव व श्री गणेशोत्सवामध्ये कलापथकाचे प्रयोग चालायचे.कारंजा शहरामधील कलापथकाचे खरे कलाकार,निर्माते व दिग्दर्शक म्हणून प्रकाश वानखडे ( पंचशिलनगर ) डी जी मोरे म्हणजेच देवमन मोरे व श्री कामाक्षा माता मंदिरचे गोंधळी असलेले अस्सल खानदानी कलावंत डी व्ही कडोळे म्हणजेच ज्ञानेश्वर विठ्ठलराव कडोळे,स्व. प्यारेलाल कनोजे वगैरे हे तत्कालिन स्थानिक कारंजाचे जन्मतः रहिवाशी असलेले खरेखुरे नाटयकलावंत होते.व हे सर्वच ज्येष्ठ कलावंत आज नाना प्रकारच्या दुर्धर आजाराशी संघर्ष करीत लढत आहेत.त्यानंतर कारंजा शहरामध्ये माजी नगराध्यक्ष अरविंदजी लाठीया व त्यांच्या सहकारी मित्रांनी कारंजा जेसीजची स्थापना करून,कलाकारांना व्यासपिठ उपलब्ध करून दिले होते.त्यांच्या व्यासपिठावरून अनिल कर्हे, प्रकाश गवळीकर आदी यशस्वी नाट्यकलाकार तयार झाले. त्यानंतर यापैकीच काही कलाकाराच्या मदतीने कारंजा शहरात अखिल भारतिय नाट्य परिषदेची शाखा जन्माला घालण्यात आली.व पुढे राजकारण करीत यांना (स्थानिक खर्याखुऱ्या नाट्यकलावंताना दुर सारूनच हेतूपुरस्परपणे राजकारण करीत,अखिल भारतिय नाट्य परिषदे मध्ये नाट्यक्षेत्राशी काडीचाही संबध नसणार्याना आजीवन सदस्यत्व बहाल करण्यात आले.असो नाट्य चळवळ चालविणे अहऱ्यागहऱ्या नथ्थू खैर्याचे काम नसून,त्याला बहुजन समाजातील हाडाचाच कलावंत असावा लागतो.आज एककाळी रंगमच गाजविणाऱ्या या कलाकारांनी आणि माजी नगराध्यक्ष अरविंद लाठीया इत्यादिंनी,अखिल भारतिय नाट्य परिषदेत नवोदित कलाकारांना सुद्धा व्यासपिठ मिळावे ह्या उदात्त हेतूने,निवडणूकीत प्रामाणिक, इमानदार,सत्यवचनी व मुख्य म्हणजे निस्वार्थी उमेद्वार नंदकिशोर अंबादास कव्हळकर व उज्वल दत्तात्रय देशमुख यांना पाठींबा दिला असून, रविवारी दि.१६ एप्रिल रोजी होणाऱ्या अखिल भारतिय नाट्य परिषद निवडणूकीत,मतदार राजाने, कोणत्याही चुकीच्या आमिषाला बळी न पडता किंवा कुणाच्याही दबावाखाली न येता, निर्भिडपणे व शांत डोक्याने उमेदवाराच्या, पहिल्या व चौथ्या क्रमांकासमोर पेनाने खून करून प्रचंड मताधिक्याने नंदकिशोर कव्हळकर व उज्वल दत्तात्रय देशमुख यांनाच विजयी करण्याचे आवाहन केले आहे.असे वृत्त महाराष्ट्र राज्यस्तरीय पत्रकार परिषदेला मिळाले असल्याचे संजय कडोळे यांनी कळवीले आहे.