ब्रम्हपुरी: महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनियन संलग्न आयटक ब्रम्हपुरी तालुका कौन्सिल च्या वतीने , आशा व गट प्रवर्तक यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या,किमान वेतन लागू करा,दिवाळी बोनस दरवर्षी दोन हजार रुपये देण्यात यावे, कोरोना थकीत मानधन ग्राम पंचायत, नगर परिषद कडून तातडीने देण्यात यावे व केंद्र सरकारचा जानेवारी पासून थकित असलेला मोबदला त्वरित द्या यासह अन्य मागण्यांसाठी देशव्यापी आंदोलनाची हाक दिली होती त्या नुसार आयटक चे राज्य सचिव कॉ.विनोद झोडगे पाटील यांच्या मार्गदर्शनात दिनांक 20 मे 2025 रोजी पंचायत समिती कार्यालय वर धडक देत मा.गट विकास अधिकारी यांच्या मार्फत मा.पंतप्रधान व मुख्यमंत्री, यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटलं आहे की सप्टेंबर 2018 पासून केंद्र शासनाने मोबदल्यामध्ये कोणती वाढ केली नसून कोरोनाच्या काळात आशा वर्कर व गटप्रवर्तक कडून महत्त्वाचे काम करून घेतल्या नंतर सुद्धा 31 महिन्याचा दरमहा 1000 रू.थकीत मोबदला आता पर्यंत जिल्यातील अनेक ग्राम पंचायत, नगर परिषद व नगर पंचायत ने दिलेला नाही त्याची तातडीने अमंलबजावणी करावी.
कोरोना नंतर ज्या कामाचा मोबदला शासन स्तरावरून मिळत असे त्या कामाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणामध्ये मोफत मध्ये शक्तीने राबवण्याचा केंद्र सरकार प्रयत्न करीत आहे. त्यामुळे मानधन वाढीकरता केंद्र शासनाचे विरोधात मोठा लढा लढणे गरजेचे आहे. गट प्रवर्तक यांना कंत्राटी कर्मजारी दर्जा देऊन शासकीय सेवेत समायोजन करण्यात यावे.आशा व गट प्रवर्तक यांना रिटायरमेंट नंतर ५ लाख रुपये ग्रॅज्युटी, १० हजार रुपये मासिक पेन्शन व २ हजार रुपये दिवाळी बोनस आशा वर्कर व गटप्रवर्तक यांना मिळावा तसेच त्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन किमान वेतन लागू करण्यात यावे,योजना व्यतिरीक्त कामे सांगू नये, वीणा मोबदला कोणत्याही कामाची आशा व गट प्रवर्तक यांना शक्ती लादू नये.जानेवारी पासून केंद्र सरकार चा मानधन थकीत आहे तो त्वरीत देण्यात यावा ,चार श्रम संहिता रद्द करा महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक मागे घ्या याशिवाय अन्य मागण्या यावेळी करण्यात आल्या.निवेदन देताना आयटक तालुका अध्यक्ष कॉ. ज्योत्स्ना ठोंबरे, हिरकण्या सोनुले , पतिता साखरे, साधना नाकतोडे, सुषमा धोटे गीता मेश्राम, भावना आंबोने यासह तालुक्यातील बहुसंख्य आशा व गट प्रवर्तक कर्मचारी उपस्थित होत्या.