वाशिम : अकोला नगरीसह संपूर्ण पश्चिम विदर्भ व इतरत्र अनेक ठिकाणी, नैसर्गिक पर्यावरणाचा ऱ्हास झाल्याच्या परिणामाने उष्णतेचा प्रकोप जाणवत असून, अक्षरशः सुर्यनारायण देवता आग ओकत असल्याचा भास होत आहे. त्यामुळे अंगाची लाही होत आहे. तापमानाने सरासरी पेक्षा उंची गाठलेली असून, येत्या तीन दिवसात महाराष्ट्राच्या काही भागात पारा 42 अंश सेल्सियस ते 45 अंश सेल्सियस जाण्याची शक्यता आहे. प्रखर उष्णतेमुळे रस्त्याने चालणारी वाहने पेट घेत असल्याच्या अनेक घटना समोर येत असून कालच अकोला शहरात एका गोरक्षण रोडवर सुद्धा द बर्निंग कार चा थरार पहायला मिळाला. त्याखेरीज अनेक ठिकानी शॉट सर्कीट होऊन आगी लागण्याच्या घटना देखील पुढे येत आहेत. प्रखर उष्णतेचा गंभीर परिणाम मानवी जीवनावर होत असून, उष्माघात होणे. ताप-जुलाब-मळमळणे- डोके दुखी, चक्कर येणे व जीव घाबरणे असे आजार जाणवत आहेत.त्यामुळे या संदर्भात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या प्रदेश उपाध्यक्ष संजय कडोळे यांनी ज्येष्ठ डॉक्टर मुजफ्फर खान यांना उपाय विचारले असता त्यांनी आपली कामे सकाळी आणि सांयकाळी उरकण्याचा सल्ला देत, शक्यतो दिवसा सकाळी ११ : ०० ते सांयकाळी ०५:०० पर्यंत घराबाहेर आणि रस्त्यावर जाणे टाळण्यास सांगीतले असून एकदम उन्हातून घरी आल्या बरोबर शितपेय व थंडगार पाणी न पिण्याचा सल्ला दिला आहे. उन्हातून आल्यानंतर थोडा वेळ थांबून पाणी प्यावे. वातानुकुलीत (ए.सी. किंवा कुलर) च्या थंड वातावरणातून किंवा ए.सी . वाहनातून लगेच उन्हात उभे न राहण्याचा सल्ला दिला आहे. तसेच आरोग्य विषयक तक्रारी असल्यास आपल्या फॅमिली डॉक्टराची भेट घेण्याचा सल्ला दिला आहे.त्याचप्रमाणे या वातावरणाविषयी आम्ही जिल्ह्यातील सुप्रसिद्ध हवामान अभ्यासक गोपाल विश्वनाथ गावंडे यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सांगीतले. उन्हाळ्याचे आणखी दोन महिने शिल्लक असून आजचे उष्णतामान मे महिन्याच्या उत्तरार्धा पर्यंत कमि अधिक प्रमाणात कायम राहण्याची शक्यता आहे. तसेच दि. १२ एप्रिल ते १७ एप्रिल आणि दि . २र एप्रिल ते ३० एप्रिलचे दरम्यान राज्याच्या काही भागात पुन्हा एकदा अवकाळी गारपिट सदृश्य आणि वादळी पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे नागरीकांनी शक्यतोवर घराबाहेर पडतांना डोक्याला रुमाल किंवा टोपी आणि गॉगल लावूनच बाहेर पडावे.आपल्या जवळ कांदा भिमसेनी कापूर व पिण्याच्या पाण्याची बॉटल ठेवावी. कोल्ड्रींक न पिता लिंबू शरबत, सोप खडीसाखर चे शरबत,ताक वगैरे देशी शितपेय घ्यावे. जास्तवेळ उन्हामध्ये न थांबता मिळेल तेथे सावलीचा आसरा घ्यावा.अवकाळी पावसाची शक्यता दिसताच शेतकऱ्यांनी शेतातून घरी परतावे. विजा चमकत असतांना झाडाच्या खाली थांबू नये.असे आवाहन करण्यात येत आहे.